Mumbai Port Authority Recruitment: मुंबईत नोकरी शोधणाऱ्या तरुणांना चांगल्या नोकरीची संधी चालून आली आहे. मुंबई पोर्ट अथॉरिटीमध्ये (Mumbai Port Authority Job)विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. मुंबई पोर्ट अथॉरिटीमध्ये ट्रेनी लीगल पदाच्या (Trainee Legal Post) एकूण १८ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. एलएलबी पदवी मिळविलेले उमेदवार या रिक्त पदांसाठी अर्ज करु शकतात. मुंबई पोर्ट अथॉरिटी ट्रेनी भरती २०२२ चा अर्ज अधिकृत वेबसाइटवर डाऊनलोड करता येणार आहे. हा अर्ज भरुन दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. ट्रेनी लीगल पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना प्रतिष्ठित पदाच्या नोकरीसोबत चांगला पगार देखील मिळणार आहे.
ट्रेनी लीगलच्या एकूण १८ जागांमध्ये एससी उमेदवारांसाठी १, एसटी उमेदवारांसाठी १ आणि ओबीसी उमेदवारांसाठी ४ जागा राखीव आहेत.
Mumbai Port Authority Job: पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून ३ वर्षे किंवा ५ वर्षे एलएलबी पदवी असणे आवश्यक आहे. एलएलबीच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात. उमेदवाराचे वय २१ ते ३० वर्षांदरम्यान असावे. एससी आणि एसटी उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत ५ वर्षांची सवलत देण्यात येणार आहे. ओबीसी उमेदवारांना ३ वर्षांपर्यंत सवलत आहे. उमेदवारांना मुंबई पोर्ट अथॉरिटीने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.
पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.
या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज सेक्रेटरी, मुंबई पोर्ट अथॉरिटी, सामान्य प्रशासन विभाग पोर्ट हाऊस, दुसरा मजला,शूरजी वल्लभदास मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई- ४००००१ या पत्त्यावर पाठवायचे आहेत. १ ऑगस्ट २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.