मुंबई : आता लवकरच लग्नसराईचे दिवस सुरू होत आहेत. या लग्नसराईच्या काळात बॉलिवूडमधील अनेक जोड्या विवाहबद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये बॉलिवूडमधील सर्वात क्युट कपल म्हणून ओळखले जाणारे रणवीर कपूर आणि आलिया भट यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे. रविवारी हे दोघेजण जयपूर येथे गेले होते. त्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहेत. या दोघांना पाहून ते त्यांचे डेस्टिनेशन वेडिंगचे ठिकाण पाहण्यासाठी जयपूरला गेले असतील अशी चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे.
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट खूप दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांचे नाते आता जगजाहीर झाले आहे.हे दोघेहीजण एकमेकांच्या दोघंही कौटुंबिक कार्यक्रमांत, एकमेकांसोबत सुट्ट्या एन्जॉय करतात. त्यामुळे हे दोघेजण आता कधी लग्न करणार असल्याच्या चर्चा सातत्याने होत होत्या. परंतु या दोघांनीही अथवा त्यांच्या घरच्यांनी यावर अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
जोधपूरला अनेक कलाकारांची पसंती
रणबीर आणि आलिया हे दोघेजण अनेकदा एकत्र फिरताना दिसतात. रविवारी जोधपूरमध्ये ते एकत्र दिसले होते. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ते जोधपूरला त्यांच्या लग्नाचे ठिकाण पाहण्यासाठी आले असल्याची चर्चा सुरू झाली. एका युझरने तर कॉमेन्ट केली की, 'आता हे तर ऑफिशिअल झाले आहे.' अनेक युझर्सनी या दोघांचे अभिनंदन करायला सुरुवात केली आहे.
अर्थात हे दोघे जयपूरला नेमके कशासाठी आले आहेत, याचा उलगडा झालेला नाही. जोधपूर हे कायमच सेलिब्रिटींसाठी लग्नाचे आवडते ठिकाण आहे. त्यामुळेच आलिया आणि रणबीर देखील लग्नाचे ठिकाण पाहण्यासाठी आले असावेत अशी चर्चा होत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये रणबीरने ब्राऊन रंगाचा सैलसर टी शर्ट आणि ट्राऊझ घातले होते. तर आलियाने ग्रीन व्हाईट रंगाचे प्रिन्टेट जॅकेट आणि जीन्स घातली होती. या दोघांनी त्यांच्या चेहऱ्यावर मास्क लावले होते.
रणबीरचा वाढदिवस
अशीही चर्चा आहे की, २८ सप्टेंबर रोजी रणबीर कपूरचा वाढदिवस आहे. त्यामुळे वाढदिवस साजरा करण्यासाठी म्हणून ते जोधपूरला गेले असावेत. काही महिन्यांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये स्वतः रणबीर कपूरने सांगितले होते की, करोना नसता तर त्याचे आणि आलियाचे लग्न झाले असते.
लग्नानंतर नवीन घरात राहणार
दरम्यान, लग्न झाल्यानंतर आलिया आणि रणबीर हे दोघेजण त्यांच्या नवीन घरात राहायला जाण्याची शक्यता आहे. रणवीरच्या नवीन घराच्या रिनोवेशनचे काम अनेक महिन्यांपासून सुरू आहे. या कामावर रणवीरची आई अभिनेत्री नीतू कपूर लक्ष ठेवून आहेत. मध्यंतरी नीतू आणि आलिया घराचे काम पाहण्यासाठी एकत्र गेले होते. त्यानंतर गेल्याच आठवड्यात घरातील काम पाहण्यासाठी आलिया एकटीच आली होती.
आलियाच्या कामाच्या बाबत सांगायचे तर ती 'गंगूबाई काठियावाडी' आणि 'आरआरआर' या सिनेमांत दिसणार आहे. तर रणबीरचा 'शमशेरा' हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. याशिवाय आलिया आणि रणबीर यांनी एकत्र काम केलेला 'ब्रह्मास्त्र' हा सिनेमा देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे.