नवी दिल्ली:
INX मीडिया प्रकरणात चौकशी सुरू असलेले माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना उद्यापर्यंत दिलासा मिळाला आहे. ईडीच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली नाही. बुधवारी पुढील सुनावणी होणार आहे.
चिदंबरम यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सुप्रीम कोर्टात आज युक्तीवाद केला की ज्या पीएमएलए कायद्याच्या उल्लंघनाचा आरोप चिदंबरम यांच्यावर करण्यात आला आहे, तो कायदा २००९ मध्ये आला होता आणि या आधारवर चिदंबरम यांच्यावर केस दाखल होऊ शकत नाही. कराण त्यांच्यावरील आरोप २००७ चा आहे.
दरम्यान, सीबीआय आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणी चिदंबरम यांना प्रमुख आरोपी बनवू शकते, अशी सूत्रांची माहिती आहे. चिदंबरम सध्या सीबीआय कोठडीत आहेत. दिल्लीच्या विशेष सीबीआय कोर्टाने सोमवारी त्यांची कोठडी ३० ऑगस्टपर्यंत वाढवली आहे.