मुंबई :
बेस्ट बस गेले ९ दिवस धावल्या नाहीत. याचा फटका सामान्य मुंबईकरांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. त्यामुळे बस पासधारकांच्या संपकाळातल्या पासचा वैधता कालावधी ९ दिवसांनी वाढवण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे.
ज्यांच्याकडे बेस्टचा मासिक पास आहे, त्यांना संपकाळात न झालेल्या प्रवासाचा फटका बसला. हे ९ दिवस म्हणजेच ८ जानेवारी २०१९ ते १६ जानेवारीपर्यंतच्या ९ दिवसांचा पास प्रशासन वाढवणार आहे. यासाठी प्रवाशांच्या पावतीवर वैधता कालावधी दर्शवणारा वेगला स्टॅम्प मारता येईल. पावती चांगल्या स्थितीत असल्यास त्यावर हा स्टॅम्प मारला जाईल, पावती चांगल्या स्थितीत नसल्यास नव्या पावतीवर हा वैधता कालावधी वाढवून देता येईल. त्यामुळे संपामुळे बसच्या पासाचे पैसै वाया गेले असे मुंबईकरांना वाटणार नाही.