अ‍ॅपशहर

पोलीस ठाण्याच्या आवारात व्यक्तीने पेटवून घेतले

पोलीस तक्रार घेत नाहीत म्हणून संतापलेल्या एका व्यक्तीने पोलीस ठाण्यातच स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना आज गोवंडीच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात घडली. रिझवान हमीद जमादार (४५) असे या व्यक्तीचे नाव असून या घटनेत तो गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, या घटनेमुळे गोवंडीत एकच खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Oct 2019, 10:23 pm
मुंबई: पोलीस तक्रार घेत नाहीत म्हणून संतापलेल्या एका व्यक्तीने पोलीस ठाण्यातच स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना आज गोवंडीच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात घडली. रिझवान हमीद जमादार (४५) असे या व्यक्तीचे नाव असून या घटनेत तो गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, या घटनेमुळे गोवंडीत एकच खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम govandi


रिझवान जमादार असं या व्यक्तीचं नाव आहे. तो गोवंडीच्या बैंगनवाडी राहतो. दोन दिवसांपूर्वी याच परिसरामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत भांडण झाले होते. गाडी पार्किंगवरून त्यांच्यामध्ये वाद झाला होता. यानंतर संबंधित व्यक्ती धमकावत असल्याने रिझवान सोमवारी तक्रार देण्यासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेला. पोलिसांनी चार ते पाच तास रिझवानला पोलिस ठाण्यातच बसवून ठेवले आणि तक्रार न घेताच घरी पाठविले. दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी रिझवान पुन्हा पोलीस ठाण्यात गेला. मात्र यावेळीही पोलिसांनी तेच केले. पुन्हा चार ते पाच तास बसवून ठेवल्यामुळे रिझवान संतापला. पोलीस आपल्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे पाहून तो पोलीस ठाण्याबाहेर गेला. पोलीस ठाण्याच्या बाहेर जाऊन त्याने रॉकेल घेतले. आवाराबाहेरच अंगावर रॉकेल ओतून तो पोलीस ठाण्यात आला आणि स्वतःला पेटवून घेतले. रिझवानला पेटताना पाहून पोलिसांची एकच पळापळ झाली. पोलीस ठाण्यात जे काही मिळेल त्या आधारे पोलिसांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. आग आटोक्यात आल्यानंतर रिझवानला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. या आगीत रिजवान हा ३० ते ३५ टक्के भाजला आहे. त्याची प्रकृती गंभीर असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात येत आहे.

दरम्यान, याप्रकरणी लवकरच रिझवानची पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात येणार आहे. तसेच त्याच्या पत्नीसह भावाला चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे. रिझवानची तक्रार नोंदविण्यात पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप होत आहे. त्यातून त्याने स्वत:ला पेटवून घेतले. त्यामुळे दोषी पोलिसांवर लवकरच कारवाई होण्याचे संकेत वरिष्ठांकडून देण्यात आले आहे.

नांदेडमध्ये एकाने पेटवून घेतले होते

यापूर्वी जुलै महिन्यात नांदेडच्या हिमायतनगर शहरातील शेख सद्दाम शेख अहेमद या २५ वर्षीय युवकाने पोलीस ठाण्याच्या आवारात अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले. पोलीसांनी तात्काळ आग विझवत तरुणाला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घरी पति-पत्नीतील वाद झाल्याने युवकाने हे पाऊल उचलल्याचे सूत्रांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज
ट्रेंडिंग