म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
नगरसेवकांच्या तक्रारीनंतर शहरातील दुरवस्था झालेल्या जॉगिंग ट्रॅकच्या डागडूजीला महापालिकेने सुरुवात केली आहे. जॉगिंग ट्रॅकवर झाडे लावणे, पाण्याची सुविधा उपलब्ध करणे, टॉयलेटच्या सुविधा उभारणे, आदी कामांचा यात समावेश आहे. सोबतच जॉगिंग ट्रॅकसाठी आवश्यक असलेल्या पाण्यासाठी तिथेच बोअरवेल्स केले जाणार आहेत.
शहरातील सहा विभागात २७ जॉगिंग ट्रॅक असून त्या ठिकाणी सोयीसुविधांची कमतरता आहे. या सुविधांसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मुरूम टाकून ट्रॅकची दुरुस्ती करण्यास सुरुवात केली आहे. जॉगिंग ट्रॅकमध्ये झाडे लावण्यासाठीचे टेंडर काढले जाणार आहे. सध्या पाणीटंचाई असल्यामुळे ट्रॅकवर पाणी टाकले जात नाही. त्यामुळे ट्रॅकजवळ बोअरवेल्स करून पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.