म. टा. प्रतिनिधी, पुणे
खते व पेट्रोकेमिकल्स क्षेत्रातील पुणेस्थित आघाडीची कंपनी असलेल्या दीपक फर्टिलायझर्स या कंपनीची प्राप्तिकर विभागाने नुकतीच चौकशी केली आहे.
प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी १५ नोव्हेंबरपासून कंपनीच्या विविध कार्यालयांमध्ये तपासणी केली व काही कागदपत्रे ताब्यात घेतली. याबाबतची माहिती कंपनीने मुंबई शेअर बाजारालाही कळवली आहे. कंपनीने प्राप्तिकर विभागाला संपूर्ण सहकार्य केले आहे; तसेच कंपनीने कायदेशीर बाबींचे काटेकोर पालन केले आहे, असेही कंपनीने मुंबई शेअर बाजाराला पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.