पुणे:
स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमधून गळती झाल्यानंतर स्फोट होऊन घराला भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी पिंपरी-चिंचवडमधील कासारवाडीत घडली. या आगीत कुटुंबातील तीन मुलांसह पाच जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कासारवाडीत केशव नगरमधील गुरुनाथ कॉलनीत ही घटना घडली. बिरादार कुटुंब गाढ झोपेत होतं. त्यांच्या घरातील सिलिंडरमधून रात्रीपासूनच गॅस गळती सुरू होती. सकाळी आठच्या सुमारास स्फोट होऊन घराला आग लागली. सर्व जण झोपेत असतानाच ही आग लागली. कुणालाच तत्काळ घरातून बाहेर पडणं शक्य झालं नाही. या दुर्घटनेत शोभा बिरादार (वय ३०), गणेश बिरादार (वय ८), शुभम बिरादार (वय ५), देवांश बिरादार (वय ३), विजय जाधव (वय २२) हे जखमी झाले आहेत. त्यांना वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमधून गळती झाल्यानंतर स्फोट होऊन घराला भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी पिंपरी-चिंचवडमधील कासारवाडीत घडली. या आगीत कुटुंबातील तीन मुलांसह पाच जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.