प्रेम कसं असतं पाहायचंय! अर्जुन- मलायकाचं 'पॅरिस लव्ह'चे फोटो नक्की पाहा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Jul 2022, 4:06 pm

मलायका आणि अर्जुन कपूर बी-टाउनची ही जोडी सतत चर्चेत असते. मलायकाने अर्जुन कपूरच्या वाढदिवशी एक खास पोस्ट शेअर केली आहे. अर्जुनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत तिने काही फोटो शेअर केले आहेत.

  • मलायकाकडून अर्जुनचे खास फोटो शेअर

    मलायकाने अर्जुनचे काही खास फोटो आणि व्हिडिओही शेअर केले आहेत. फोटोसह तिने तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत अशा शुभेच्छाही दिल्या आहेत.

  • चाहत्यांच्या शुभेच्छा

    अर्जुन आणि मलायकाच्या या फोटोवर चाहत्यांनीही भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत.

  • पॅरिसमध्ये वाढदिवसाचं सेलिब्रेशन

    मलायकाने अर्जुनला त्यांच्या रिलेशनशिपवरुन अनेकदा ट्रोलही केलं जातं. त्यांची लव्हस्टोरी सतत चर्चेत असते. मलायकाने पॅरिसमधील हॉटेलधून एक फोटो शेअर केला आहे.

  • ३७वा वाढदिवस

    अर्जुन पॅरिसमध्ये मलायकासोबत आपला ३७वा वाढदिवस साजरा करत आहे. दोघांनी एकमेकांना भरवतानाचे व्हिडिओ शेअर केले आहेत.

  • असे आणखी फोटो पाहाDownload App
  • लॅक्मे फॅशन विक

    मलायका आणि अर्जुनला सर्वात पहिले लॅक्मे फॅशन विकमध्ये एकत्र पाहण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तिथूनच त्यांची स्टोरी सुरू झाल्याचं म्हटलं जातं.

  • १२ वर्षांचं अंतर

    मलायका ४८ वर्षांची आहे, तर अर्जुन ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. दोघांमध्ये जवळपास १२ वर्षांचं अंतर आहे. त्यांच्या वयातील अंतरावरुन, तसंच मलायकाला एक मुलगाही असल्याने तिच्या अर्जुनसोबत असलेल्या नात्याला ट्रोल केलं जात होतं.

  • Loading ...
  • अरबाजसोबत घटस्फोट

    मलायकाचा २०१७ मध्ये अरबाज खानसोबत घटस्फोट झाला होता. लग्नाच्या १८ वर्षांनंतर मलायका आणि अरबाज वेगळे झाले होते.