नवी दिल्ली
इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीतील सामन्यात किदाम्बी श्रीकांतचा पराभव झाला. डेन्मार्कच्या व्हिक्टर अॅक्सलसेनने किदाम्बीचा पराभव करत विजेतेपद पटकावले. अॅक्सलसेनने २१-७, २२-२० अशा सलग दोन सेटमध्ये श्रीकांतला पराभूत केले.
इंदिरा गांधी स्टेडियमवर विजेतेपदासाठी झालेल्या या सामन्यात पहिला सेट १२ मिनिटांत गुंडाळत व्हिक्टर अॅक्सलसेनने आपले वर्चस्व दाखवून दिले. परंतू दुसऱ्या सेटमध्ये श्रीकांतने सावध खे ळ करत दिलेली टक्कर अपयशी ठरली.
अॅक्सेलसेनने २०१७ मध्ये इंडियन ओपन पुरूष एकेरीचे विजेतेपद जिंकले होते.