नवी दिल्ली: वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ख्रिस गेल (chris gayle) चे नाव घेतले की मैदानामधील तुफानी खेळी बरोबरच त्यांची रंगेल लाईफ स्टाईल समोर येते. जगातील बिंधास्त क्रिकेटपटूंची यादी केली तर गेलेचे नाव आघाडीवर असेल. मैदानात आणि मैदानाबाहेर गेल नेहमीच चर्चेत असतो. या ४० वर्षीय माजी क्रिकेटपटू पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
मैदानात आक्रमक खेळीने गोलंदाजांची झोप उडवणाऱ्या गेलचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ खुद्द गेलनेच त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ४० वर्षाचा गेल या व्हिडिओत प्रोफेशनल डान्सर प्रमाणे नाचत आहे. अर्थात पार्टीचा किंवा नाचणारा व्हिडिओ शेअर करायची गेलची ही पहिली वेळ नाही. याआधीही गेलने अनेक वेळा पार्टीतील व्हिडिओ शेअर केले आहेत.
व्हिडिओत गेल शर्ट ओपन करून डान्स करत आहे. डान्स करताना त्याचे सिक्स पॅक देखील दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्याने AfterParty #40ShadesOfGayle New York असे ओळ देखील लिहली आहे. त्याच्या या व्हिडिओवर चाहते एकापेक्षा एक भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी तर हा डान्स पाहून गेलला मूनवॉकर मायकल जॅक्सन असल्याचे म्हटले आहे.
https://www.instagram.com/tv/B6B2tjAlZeQ/?igshid=hcuwf4ixs4kr
गेलने भारत दौऱ्याआधी स्वत:चे नाव मागे घेतले होते. निवड समितीची इच्छा आहे की मी क्रिकेट खेळावे. पण या वर्षी मी विश्रांती घेणार असल्याचे त्याने म्हटले होते. गेल यावर्षी ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये खेळणार नसल्याचे जाहीर केले आहे.