पणजी : गोवा जलतरण संघटनेत प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सूरजित गांगुली याच्याविरुद्ध बलात्कार आणि धमकी असे आरोप ठेवण्यात आले असू त्याच्या शोधात पोलिसांचे एक पथक रवाना झाले आहे.
गांगुलीवर त्याच्या मार्गदर्शनाखाली तयार होत असलेल्या १५ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. पोलीस उपअधीक्षक यांनी म्हटले आहे की, या आरोपीसाठी आम्ही शोधमोहीम हाती घेतली असून तो भोपाळला पळाल्याचे आम्हाला कळले आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला होता. त्यानंतर क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी या प्रशिक्षकावर कठोर कारवाईचे आश्वासन दिले होते. हा व्हिडिओ सगळीकडे पसरल्यानंतर या प्रशिक्षकाची गोवा संघटनेने हकालपट्टी केली.