मंजूषा सहस्रबुद्धे
उपांत्यपूर्व फेरीत
पुणे : पुण्याच्या मंजूषा सहस्रबुद्धे यांनी राम लखन यांच्या साथीत बीडब्लूएफ वर्ल्ड सीनियर बॅडमिंटन स्पर्धेतील ५५ वर्षांवरील मिश्र दुहेरीतून उपांत्यपूर्व फेरी गाठली. पोलंडमध्ये ही स्पर्धा सुरू आहे. मिश्र दुहेरीच्या तिसऱ्या फेरीत मंजूषा सहस्रबुद्धे-राम लखन यांनी मॉरिन क्लेइजवेग्ट ओस्काम-रिक पाप या नेदरलँड्सच्या जोडीवर २१-१३, २१-१६ अशी मात केली. महिला दुहेरीत मात्र मंजूषा सहस्रबुद्धे-सुकेशा साग्गी यांना पराभवाला सामोरे जावे लागले. इंग्लंडच्या सूजान कूल्सन-पॉलिन विल्यम्स यांनी मंजूषा-सुकेशा यांच्यावर २१-१८, २१-१७ अशी मात केली.