अ‍ॅपशहर

पालघरमध्ये २४७ विद्यार्थ्यांना विषबाधा!

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील २४७ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु असून १७ विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Maharashtra Times 25 Feb 2016, 10:19 pm
मटा ऑनलाइन वृत्त । पालघर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 247 fall ill after eating meal at maharashtra school
पालघरमध्ये २४७ विद्यार्थ्यांना विषबाधा!


पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील २४७ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु असून १७ विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

विक्रमगड तालुक्यातील कासा बुद्रुक गावातील जिल्हा परिषदेच्या शाळतील विद्यार्थ्यांना गुरुवारी दुपारी शालेय पोषण आहारातून खिचडी देण्यात आली होती. शाळेतील पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना खिचडी देण्यात आली होती. अर्ध्या तासानंतर ५० मुलांना उलट्या, जुलाब, पोटदुखी आणि चक्कर येणे असे त्रास होऊ लागले. शिक्षकांनी तातडीने विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. संध्याकाळपर्यंत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना विक्रमगड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी शाळेला भेट देऊन तपासणीसाठी खिचडीचे नमुने घेतले आहेत. तर कास पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज