अ‍ॅपशहर

१२ एप्रिल २०१९चे वार्षिक राशीभविष्य

मंगळ, चंद्र आणि राहू वर्षाचे स्वामी आहेत. एप्रिलच्या अखेरच्या पाच दिवसात चांगल्या नोकरीचे योग येतील. जर आपण एखादा जुना वाद, खटला किंवा कामात व्यस्त असाल तर मे महिन्यात या सर्वातून मुक्तता होईल.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Apr 2019, 10:39 am
आचार्य कृष्णदत्त शर्मा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sumitra-mahajan


(लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, लोककला अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, लेखक-चित्रकार सुभाष अवचट, माजी मंत्री सतेज पाटील यांचा आज वाढदिवस आहे. यांच्यासह ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा)

मंगळ, चंद्र आणि राहू वर्षाचे स्वामी आहेत. एप्रिलच्या अखेरच्या पाच दिवसात चांगल्या नोकरीचे योग येतील. जर आपण एखादा जुना वाद, खटला किंवा कामात व्यस्त असाल तर मे महिन्यात या सर्वातून मुक्तता होईल.

काही जणांचे जन्मकालीन ग्रह कमकुवत आहेत आणि वर्तमानात शनी, राहू, केतू यांच्या दशेने ग्रस्त आहात, अशा लोकांसाठी येत्या जून आणि जुलैमध्ये विशेष परिश्रम केल्यानंतर समाधानकारक आर्थिक यश मिळेल. व्यापाऱ्यांना प्रतिस्पर्धी आणि आर्थिक तेजी-मंदीच्या प्रभावाला ऑगस्टपासून सप्टेंबरपर्यंत सामोरे जावे लागण्याची शक्यता राहील.

काहीजणांना ऑक्टोबरपासून नोव्हेंबरपर्यंत वाहन, मशिनरी इत्यादींचा लाभ होईल. डिसेंबरमध्ये पुन्हा व्यापारात मंदी येईल. जानेवारी २०२० मध्ये व्यापारात वेगाने लाभ होईल. फेब्रुवारीत महिलांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. मार्चच्या प्रारंभापासून ते एप्रिल अखेरपर्यंत विद्यार्थ्यांना सामान्य परिश्रमानेही चांगले यश मिळेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज