अ‍ॅपशहर

०२ जून २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य

बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांचा आज वाढदिवस आहे. महिलांना यंदाचे वर्ष इच्छा पूर्ण करणारे ठरेल. आज जन्मदिवस असणाऱ्यांना आगामी वर्ष कसे जाईल, सांगताहेत आचार्य कृष्णदत्त शर्मा...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Jun 2020, 10:21 am
बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांचा आज जन्मदिवस आहे. सोनाक्षी सिन्हा यांच्यासह आज वाढदिवस असणाऱ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी उत्तमोत्तम हार्दिक शुभेच्छा...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sonakshi sinha


आज वाढदिवस असणाऱ्यांना आगामी वर्ष कसे जाईल, याचा आचार्य कृष्णदत्त शर्मा यांनी घेतलेला आढावा...

कर्क: शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ याचा प्रत्यय येईल; आजचे राशीभविष्य

आगामी वर्षात आपल्यावर मंगळ, बुध ग्रहाचा प्रभाव राहील. जून आणि जुलै महिन्यात भौतिक सुख, कौटुंबिक आनंद प्राप्त होईल. मंगळ ग्रहाच्या प्रभावामुळे एखादे धाडस कराल. याला बुध ग्रहाची साथ मिळून कामाचे उत्तम व्यवस्थापन होऊ शकेल.

जून महिन्यात चंद्रग्रहण व सूर्यग्रहण; जाणून घ्या वेळा आणि प्रभाव

ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात हितशत्रू निर्माण होतील. मात्र, उत्तम ग्रहमानामुळे आपण त्यांचा पराभव करण्यास सक्षम व्हाल. त्यांचा त्रास आपल्याला होणार नाही. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात घरात किंवा कुटुंबातील अन्य नातेवाईकांकडे मंगल कार्ये घडण्याचा योग आहे. यामुळे कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. मन प्रफुल्लित होईल. डिसेंबर महिन्यात मित्रमंडळी, आप्तेष्ट यांच्याशी संवाद किंवा प्रत्यक्ष भेटी-गाठीचा योग आहे.

पाहाः 'हे' आहेत जून महिन्यातील प्रमुख सण-उत्सव

जानेवारी ते फेब्रुवारी २०२१ मध्ये दिनक्रम व्यस्त राहील. व्यवसाय, उद्योग विस्तारासाठी उत्तम काळ आहे. धावपळ संभवते. धार्मिक स्थळांना भेटी देण्याचा योग आहे. मार्च महिन्यात पर्यटन वा देशाटन होऊ शकते.

बेजन दारूवाला यांच्या टॉप १० भविष्यवाणी; 'ही' भाकिते ठरली अचूक

एप्रिल आणि मे या कालावधीत आपला पुरुषार्थ सिद्ध होणाऱ्या घटना घडतील. विद्यार्थ्यांसाठी आगामी वर्ष उत्तम राहील. महिलांना आगामी वर्ष मनोवांच्छित इच्छा पूर्ण करणारे ठरेल. मान, सन्मान, कीर्ती, प्रतिष्ठा यांमध्ये वाढ होईल. हितशत्रूंच्या पराभवामुळे यश मिळेल. मन प्रसन्न होईल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज