अ‍ॅपशहर

०३ नोव्हेंबर २०२०-२१ चे वार्षिक भविष्य

ज्येष्ठ अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, उषा जाधव, अभिनेते अरुण भडसावळे, बॉलिवूड अभिनेत्री सौम्या टंडन यांचा वाढदिवस आहे. आज जन्मदिवस असणाऱ्या व्यक्तींना आगामी वर्ष कसे जाईल, याचा आचार्य कृष्णदत्त शर्मा यांनी घेतलेला हा आढावा...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Nov 2020, 7:14 am
ज्येष्ठ अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, उषा जाधव, अभिनेते अरुण भडसावळे, बॉलिवूड अभिनेत्री सौम्या टंडन यांचा वाढदिवस आहे. आज जन्मदिवस असणाऱ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी उत्तमोत्तम हार्दिक शुभेच्छा...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sonali kulkarni


आज जन्मदिवस असणाऱ्या व्यक्तींना आगामी वर्ष कसे जाईल, याचा आचार्य कृष्णदत्त शर्मा यांनी घेतलेला हा आढावा...

आगामी वर्षात आपल्यावर गुरु आणि चंद्र या दोन ग्रहांचा प्रामुख्याने प्रभाव राहील. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात चांगल्या गोष्टींसाठी पैसे खर्च होतील. आनंदाची अनुभूती घ्याल. कीर्ती वृद्धिंगत होईल. मनोकामना पूर्ण होऊ शकतील.

बुध मार्गी : 'या' ९ राशींना लाभदायक दिवस; वाचा, आजचे राशीभविष्य

जानेवारी ते फेब्रुवारी २०२१ आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतील. दैनंदिन दिनक्रमात केलेला काहीसा बदल लाभदायक ठरू शकेल. मार्च व एप्रिल महिन्यात हाती घेतलेली कामे काही समस्यांनंतर पूर्ण होऊ शकतील. खर्चात वाढ संभवते. मे आणि जून महिन्यात मंगल कार्याच्या आयोजनावर चर्चा होऊन अंमल करता येऊ शकेल.

जुलै व ऑगस्ट महिन्यात पराक्रमात वाढ होऊ शकेल. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात पर्यटनाच्या योजना आखाल. प्रवास लाभदायक ठरतील. या वर्षाचा उत्तरार्ध व्यस्ततापूर्ण असेल. आगामी वर्ष विद्यार्थ्यांसाठी मनोकामना पूर्ण करणारे सिद्ध होऊ शकेल. तर महिला वर्गासाठी आगामी वर्ष उत्तम असेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज