अ‍ॅपशहर

०६ ऑगस्ट २०२०-२१ चे वार्षिक भविष्य

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि संगीतकार विशाल भारद्वाज यांचा आज वाढदिवस आहे. आज जन्मदिवस असणाऱ्यांना आगामी वर्ष कसे जाईल, सांगताहेत आचार्य कृष्ण दत्त शर्मा...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Aug 2020, 7:38 am
बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि संगीतकार विशाल भारद्वाज यांचा आज वाढदिवस आहे. विशाल भारद्वाज यांच्यासह आज जन्मदिवस असणाऱ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी उत्तमोत्तम हार्दिक शुभेच्छा...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम happy birthday


आज वाढदिवस असणाऱ्यांना आगामी वर्ष कसे जाईल, याचा आचार्य कृष्ण दत्त शर्मा यांनी घेतलेला हा आढवा...

आगामी वर्षात आपल्यावर गुरु, मंगळ या दोन ग्रहांचा प्रामुख्याने प्रभाव राहील. धनु राशीत असलेल्या गुरुचा केतुशी होणाऱ्या गुरु केतु योगाचा आपल्यावर संमिश्र प्रभाव पडेल. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात धनलाभ, धनसंचयाचे उत्तम योग जुळून येतील. हितशत्रू परास्त होतील. कार्यालयातील वरिष्ठांची मने जिंकाल.

ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात नियोजन, व्यवस्थापन आणि कार्य कौशल्य या त्रयींच्या जोरावर हाती घेतलेल्या कामांमध्ये यशस्वी व्हाल. तसेच मनोवांच्छित इच्छा पूर्ण कराल. डिसेंबर ते जानेवारी २०२१ या कालावधीत दिनक्रम अतिशय व्यस्त राहील. मेहनत आणि परिश्रम करूनही अपेक्षित यश न मिळाल्यामुळे मन खिन्न राहील. निराशेचे ढग गडद होतील. अधिक कष्ट उपसावे लागतील.

वृश्चिक: व्यायामाची आवड लावून घ्या; वाचा, तुमचे आजचे राशीभविष्य

फेब्रुवारी व मार्च महिन्यात दिलेला शब्द व हाती घेतलेली कामे वेळेत पूर्ण करावीत. अन्यथा आपल्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जाऊ शकते. एप्रिल व मे महिन्यात दैनंदित कामांमध्ये केलेला छोटासा बदल लाभदायक ठरेल.

जून व जुलै महिन्यात काही समस्यांनंतर पूर्णत्वास जातील. यश आणि प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील. मंगल कार्याच्या योजना आखल्या जातील. महिला वर्ग आणि विद्यार्थ्यांना आगामी वर्ष उत्तम, अपेक्षित यशप्राप्ती करून देणारे ठरू शकते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज