अ‍ॅपशहर

११ नोव्हेंबर २०२०-२१ चे वार्षिक भविष्य

बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते बोनी कपूर यांचा जन्मदिवस आहे. आज वाढदिवस असणाऱ्या व्यक्तींना आगामी वर्ष कसे जाईल, याचा आचार्य कृष्णदत्त शर्मा यांनी घेतलेला हा आढावा...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Nov 2020, 6:49 am
बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते बोनी कपूर यांचा जन्मदिवस आहे. यांसह आज वाढदिवस असणाऱ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी उत्तमोत्तम हार्दिक शुभेच्छा...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Happy Birthday Image


आज वाढदिवस असणाऱ्या व्यक्तींना आगामी वर्ष कसे जाईल, याचा आचार्य कृष्णदत्त शर्मा यांनी घेतलेला हा आढावा...

आगामी काळात आपल्यावर शुक्र, मंगल या दोन ग्रहांचा प्रामुख्याने प्रभाव राहील. नोव्हेंबर महिन्यात अचानक राजकृपाकारक योग जुळून येत आहेत. डिसेंबर ते जानेवारी २०२१ या कालावधीत अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या योजना मार्गी लागतील. मित्रांचे सहकार्य लाभेल.

चंद्र-शुक्रचा शुभ योग : 'या' ६ राशींना लाभाचा दिवस; आजचे राशीभविष्य

फेब्रुवारी महिन्यात रचनात्मक कार्यातून यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होऊ शकतील. स्पर्धा परीक्षांमध्ये अपेक्षित परिणाम मिळतील. मार्च व एप्रिल या महिन्यात इच्छा नसतानाही काही प्रवास करावे लागतील. वार्ता सारगर्भित ठेवा. मे आणि जून महिन्यात आपल्या कार्यकौशल्याचे कौतुक केले जाईल.

जुलै व ऑगस्ट महिन्यात जीवनस्तर उंचावणाऱ्या घटना घडतील. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात हितशत्रू, विरोधक पराभूत होतील. केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रीत केल्यास अपेक्षित यश व प्रगती साध्य करू शकाल. शक्य असल्यास नियमितपणे हनुमान चालीसा पठण करावे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज