अ‍ॅपशहर

१२ नोव्हेंबर २०२०-२१ चे वार्षिक भविष्य

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे, आनंद इंगळे, साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे यांचा जन्मदिवस आहे. आज जन्मदिवस असणाऱ्या व्यक्तींना आगामी वर्ष कसे जाईल, याचा आचार्य कृष्णदत्त शर्मा यांनी घेतलेला हा आढावा...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Nov 2020, 6:50 am
अभिनेता संकर्षण कऱ्हाडे, आनंद इंगळे, साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे यांचा जन्मदिवस आहे. यांसह आज वाढदिवस असणाऱ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी उत्तमोत्तम हार्दिक शुभेच्छा...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम anand ingale


आज जन्मदिवस असणाऱ्या व्यक्तींना आगामी वर्ष कसे जाईल, याचा आचार्य कृष्णदत्त शर्मा यांनी घेतलेला हा आढावा...

आगामी वर्षात आपल्यावर गुरु आणि मंगळ या दोन ग्रहांचा प्रामुख्याने प्रभाव राहील. दोन्ही ग्रह आपापल्या शुभ राशींमध्ये विराजमान असल्याचा सकारात्मक परिणाम आगामी वर्षावर दिसून येईल. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात ज्ञानात उत्तम भर पडेल.

जानेवारी ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत आयात-निर्यात क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना काही ना काही समस्यांचा सामना करावा लागू शकेल. मार्च महिन्यात व्यापारी वर्गाला अनेक चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतील. गेल्या वर्षीच्या काही प्रसंगांचे प्रकर्षाने स्मरण होऊ शकेल.

४ ग्रहांचा शुभ योग : 'या' ७ राशींना उत्तम दिवस; आजचे राशीभविष्य

एप्रिल महिना काहीसा आर्थिक आघाडीवर भर टाकणारा ठरू शकेल. मे महिन्यात भाग्यवर्धक क्षेत्राशी संबंध येईल. जून व जुलै महिन्यात एकाग्रता, नियोजन, व्यवस्थापन यांमुळे हाती घेतलेल्या कामात सुलभता येईल. यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होऊ शकतील.

ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात आपल्या कामाची दखल घेतली जाईल. वरिष्ठांकडून आपले कौतुक केले जाईल. मान, सन्मान प्राप्त होऊ शकतील. ऑक्टोबर महिना सामान्य राहील. आगामी वर्ष महिला वर्गासाठी उत्तम असेल. मेहनतीला पर्याय नाही, ही बाब विद्यार्थी वर्गाने नेहमी लक्षात ठेवावी. अपेक्षित यश साध्य होऊ शकेल. शक्य असल्यास गोमातेला नियमित अन्नदान करावे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज