अ‍ॅपशहर

१३ नोव्हेंबर २०२०-२१ चे वार्षिक भविष्य

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री, गायक, निर्माती जूही चावला यांचा वाढदिवस आहे. आज वाढदिवस असणाऱ्या व्यक्तींना आगामी वर्ष कसे जाईल, याचा आचार्य कृष्णदत्त शर्मा यांनी घेतलेला हा आढावा...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Nov 2020, 6:51 am
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री, गायक, निर्माती जूही चावला यांचा वाढदिवस आहे. यांसह आज जन्मदिवस असणाऱ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी उत्तमोत्तम हार्दिक शुभेच्छा...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम juhi chawla


आज वाढदिवस असणाऱ्या व्यक्तींना आगामी वर्ष कसे जाईल, याचा आचार्य कृष्णदत्त शर्मा यांनी घेतलेला हा आढावा...

आगामी वर्षात आपल्यावर मंगळ ग्रहाचा प्रामुख्याने प्रभाव राहील. नोव्हेंबर महिन्यात आयात-निर्यात क्षेत्रातील व्यक्तींना अनेकविध उत्तमोत्तम संधी उपलब्ध होतील. डिसेंबर ते जानेवारी २०२१ या कालावधीत समृद्धी वृद्धिंगत होण्याचे योग जुळून येऊ शकतील. नवीन ओळखी होतील. जनसंपर्कात भर पडेल.

त्रिग्रही योग : 'या' ९ राशींना आनंदी दिवस; आजचे राशीभविष्य

फेब्रुवारी व मार्च महिन्यात हितशत्रूंच्या कारवायांकडे दुर्लक्ष करू नये. केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करणे हिताचे ठरेल. एप्रिल आणि मे महिन्यात भाग्यवर्धक कार्यक्षेत्राशी जोडले जाल. जुन व जुलै महिन्यात नियोजन, एकाग्रता, व्यवस्थापन, कौशल्य यांच्या माध्यमातून सुरुवातील कठीण वाटणारी कामे सुलभतेने पार पडतील.

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जीवनस्तर उंचावणाऱ्या घटना घडतील. कुटुंबासोबत उत्तम वेळ व्यतीत कराल. मित्रांसोबत पर्यटनाच्या योजना आखाल. ऑक्टोबर महिना सामान्य राहील. आगामी वर्ष महिला वर्गासाठी उत्तम असेल. मेहनतीला पर्याय नाही, ही बाब विद्यार्थी वर्गाने नेहमी लक्षात ठेवावी. अपेक्षित यश साध्य होऊ शकेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज