अ‍ॅपशहर

१५ डिसेंबर २०२०-२१ चे वार्षिक भविष्य

ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, दिग्दर्शक प्रवीण राजा कारळे, डहाणूकर कॉलेजच्या माजी प्राचार्या डॉ. माधवी पेठे, चित्रकार चंद्रकला कदम यांचा जन्मदिवस आहे. आज जन्मतिथी असणाऱ्या व्यक्तींना आगामी वर्ष कसे जाईल, याचा आचार्य कृष्णदत्त शर्मा यांनी घेतलेला हा आढावा...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Dec 2020, 6:29 am
ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, दिग्दर्शक प्रवीण राजा कारळे, डहाणूकर कॉलेजच्या माजी प्राचार्या डॉ. माधवी पेठे, चित्रकार चंद्रकला कदम यांचा जन्मदिवस आहे. यांसह आज वाढदिवस असणाऱ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी उत्तमोत्तम हार्दिक शुभेच्छा...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम usha mangeshkar


आज जन्मतिथी असणाऱ्या व्यक्तींना आगामी वर्ष कसे जाईल, याचा आचार्य कृष्णदत्त शर्मा यांनी घेतलेला हा आढावा...

आगामी वर्षात आपल्यावर मंगळ, चंद्र आणि राहु या तीन ग्रहांचा प्रामुख्याने प्रभाव राहील. डिसेंबर महिन्यात नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतील. जानेवारी २०२१ या कालावधीत न्यायालयीन प्रकरणात सकारात्मक वार्ता मिळू शकतील.

धनुसंक्रांती : 'या' ६ राशींना लाभाचा दिवस; वाचा, आजचे राशीभविष्य

फेब्रुवारी व मार्च महिन्यात शनी, राहु आणि केतु यांची दशा सुरू असलेल्या व्यक्तींना अधिक मेहनत व परिश्रम घेतल्यानंतरच अपेक्षित परिणाम प्राप्त होऊ शकतील. आर्थिक स्थिती चांगली होईल. एप्रिल आणि मे महिन्यात व्यापारी वर्गाला आर्थिक तेजी-मंदीचा सामना करावा लागू शकेल.

जून व जुलै महिन्यात काही व्यक्तींना वाहन, यंत्रे यातून लाभ मिळू शकेल. ऑगस्ट महिन्यात व्यापार, व्यवसायात शिथिलता येऊ शकेल. सप्टेंबर महिन्यात उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतील. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिना सामान्य असेल. महिला वर्गासाठी आगामी वर्ष महत्त्वाकांक्षा पूर्ण करणारे ठरू शकेल. विद्यार्थी वर्गाने मेहनत व परिश्रम घेतल्यानंतरच अपेक्षित उत्तरे मिळू शकतील.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज