अ‍ॅपशहर

१९ नोव्हेंबर २०२०-२१ चे वार्षिक भविष्य

गायिका कार्तिकी गायकवाड, अभिनेत्री सुषमा शिरोमणी, तारा सुतारिया, लेखक नितीन नायगावकर, क्रिकेटपटू अनघा देशपांडे यांचा वाढदिवस आहे. आज जन्मतिथी असणाऱ्या व्यक्तींना आगामी वर्ष कसे जाईल, याचा आचार्य कृष्णदत्त शर्मा यांनी घेतलेला हा आढावा...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Nov 2020, 6:45 am
गायिका कार्तिकी गायकवाड, अभिनेत्री सुषमा शिरोमणी, तारा सुतारिया, लेखक नितीन नायगावकर, क्रिकेटपटू अनघा देशपांडे यांचा वाढदिवस आहे. यांसह आज जन्मदिवस असणाऱ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी उत्तमोत्तम हार्दिक शुभेच्छा...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kartiki gaikwad


आज जन्मतिथी असणाऱ्या व्यक्तींना आगामी वर्ष कसे जाईल, याचा आचार्य कृष्णदत्त शर्मा यांनी घेतलेला हा आढावा...

आगामी वर्षात आपल्यावर शुक्र, चंद्र आणि नेपच्युन या ग्रहांचा प्रामुख्याने प्रभाव राहील. नोव्हेंबर महिन्यात जोखीम पत्करून केलेली कामे यशकारक तसेच ख्यातीवर्धक ठरू शकतील. डिसेंबर ते जानेवारी २०२१ या कालावधीत मनोरंजन, मौज-मजा यांवर अधिक भर राहील.

चंद्राचा मकर प्रवेश : 'या' ५ राशींना शुभ दिवस; आजचे राशीभविष्य

फेब्रुवारी व मार्च महिन्यात सुख, समृद्धी, यश व प्रगती यांचा मार्ग प्रशस्त होतील. आनंदानुभूती घ्याल. एप्रिल महिन्यात भाग्यवर्धक क्षेत्राशी संबंध येईल. मे व जून महिना विवाहेच्छुक मंडळींसाठी अनुकूल राहील. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. नवीन स्थळे येतील.

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अचानक धनलाभ होण्याचे योग प्रबळ होऊ शकतील. दान-धर्म, परोपकार यांवर भर राहील. चांगल्या गोष्टीसाठी झालेला खर्च कीर्ती वृद्धिंगत करेल. मनोकामना पूर्ण होऊ शकतील. सप्टेंबर व ऑक्टोबर महिना जुने वाद संपुष्टात आणणारा ठरू शकेल. आगामी वर्ष महिला वर्गासाठी आर्थिक समृद्धी आणि वैवाहिक जीवन सुखमय करणारे ठरू शकेल. विद्यार्थ्यांचे मनोबल वाढेल. विशेष चांगले परिणाम प्राप्त करून घेण्यासाठी श्री यंत्र पूजन करणे हिताचे ठरेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज