अ‍ॅपशहर

२१ मार्च २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी यांचा आज जन्मदिवस आहे. आगामी वर्ष विद्यार्थ्यांसाठी उत्साहवर्धक ठरेल. महिलांसाठी यंदाचे वर्ष सुख, समाधानकारक ठरेल. आज वाढदिवस असणाऱ्यांना आगामी वर्ष कसे जाईल, याचा घेतलेला आढावा...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Mar 2020, 10:43 am
आचार्य कृष्ण दत्त शर्मा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rani


बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी यांचा आज जन्मदिवस आहे. राणी मुखर्जीसह आज वाढदिवस असणाऱ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी उत्तमोत्तम शुभेच्छा...


आज वाढदिवस असणाऱ्यांना आगामी वर्ष कसे जाईल, याचा घेतलेला आढावा...

वृषभ: अनपेक्षित धनलाभ; आजचे राशीभविष्य

समुद्राचे पाणी खारट असण्याचे 'हे'ही एक कारण

आगामी वर्षात आपल्यावर सूर्य आणि मंगळ ग्रहाचा प्रभाव राहील. या वर्षात विशेषत्वाने केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. बुद्धीच्या जोरावर केलेली कामे सुलभ होतील. मार्च आणि एप्रिल महिन्यात अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता आहे.

गुढी पाडव्याचे 'असे'ही महत्त्व व विविध मान्यता

चैत्र चाहूलः सृष्टीचा सृजनोत्सव; नववर्षाची नवलाई

मे व जून महिन्यात आपल्या कार्यक्षेत्रावर मंगळ ग्रहाचा प्रभाव असेल. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात दीर्घकालीन गुंतवणुकीमुळे लाभ होईल. सप्टेंबर महिन्यात दिनक्रम व्यस्त राहील. मात्र, कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत धार्मिक कार्ये पार पडतील. धार्मिक वादविवादात भाग घेऊ नका. वादविवाद टाळणे हितकारक ठरेल.

वर्षभरात चार नवरात्र?; जाणून घ्या चैत्राचे महत्त्व

बोधीवृक्ष: आवाज चढवू नका; शब्दसामर्थ्य वाढवा

डिसेंबर ते जानेवारी २०२१ बुद्धी आणि युक्तीच्या जोरावर भाग्योदय होईल. आगामी वर्ष विद्यार्थ्यांसाठी उत्साहवर्धक ठरेल. महिलांसाठी यंदाचे वर्ष सुख, समाधानकारक ठरेल. हितशत्रूंचा पराभव झाल्याने आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती वाढीस लागेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज