अ‍ॅपशहर

२३ जून २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य

ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, गायिका नेहा राजपाल, काँग्रेस नेते व अभिनेते राज बब्बर, आमदार नीतेश राणे, अभिनेत्री केतकी दवे यांचा आज वाढदिवस आहे. आज जन्मदिवस असणाऱ्यांसाठी आगामी वर्ष कसे जाईल, हे सांगताहेत आचार्य कृष्णदत्त शर्मा....

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Jun 2020, 7:16 am
ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, गायिका नेहा राजपाल, काँग्रेस नेते व अभिनेते राज बब्बर, आमदार नीतेश राणे, अभिनेत्री केतकी दवे यांचा आज जन्मदिवस आहे. या सर्वांसह आज वाढदिवस असणाऱ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी उत्तमोत्तम हार्दिक शुभेच्छा...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम raj babbar


आज वाढदिवस असणाऱ्यांना आगामी वर्ष कसे जाईल, याचा आचार्य कृष्णदत्त शर्मा यांनी घेतलेला आढावा...

मकर : आर्थिक बचतीचे नवे धोरण यशस्वी होईल; आजचे राशीभविष्य

आगामी वर्षात आपल्यावर सूर्य, मंगळ या ग्रहांचा प्रभाव राहील. उत्पन्नाची नवी साधने सापडतील आणि मिळकतीचे स्रोत वाढतील. जून आणि जुलै महिन्यात स्वतःच्या कर्तृत्वावर, हिमतीवर रोजगाराच्या नव्या संधींचे सोने करू शकाल.

तुळशीचे किती प्रकार तुम्हाला माहिती आहेत? वाचा, महत्त्व व मान्यता

बौद्धिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रात असलेल्या व्यक्तींसाठी ऑगस्ट व सप्टेंबर महिना उत्तम जाईल. विशेष मान, सन्मान, प्रतिष्ठा प्राप्त होईल. आपल्या कामाची प्रशंसा केली जाईल. ऑक्टोबर व नोव्हेंबरचा कालावधी सामान्य राहील.

मेघदूत, शाकुंतलकार, संस्कृतमधील अभिजात लेखक महाकवी कालिदास

डिसेंबर महिन्यात दिनक्रम काहीसा व्यस्त राहण्याची शक्यता आहे. मेहनत आणि परिश्रम घेऊन हाती घेतलेले काम पूर्णत्वास जाईल. यश मिळेल. जानेवारी ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत बहुतांश व्यक्तींचा भाग्यवर्धक क्षेत्राशी संबंध येईल. मन प्रसन्न राहील. आगामी वर्षाचा उत्तरार्ध उत्तम असेल.

आषाढी एकादशी वारी २०२०: पालखी - ताटी उघडा ज्ञानेश्वरा...

एप्रिल महिन्यात एखाद्या कारणावरून आप्तेष्टांशी वाद होण्याची शक्यता आहे. मे महिन्यात मंगल कार्यावर पैसे खर्च होऊ शकतात. सातत्य, निरंतरता आणि परिश्रमांनंतर विद्यार्थ्यांना अपेक्षित यश प्राप्त होऊ शकते. आगामी वर्ष महिलांसाठी सामान्य राहील.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज