अ‍ॅपशहर

२२ सप्टेंबर २०२०-२१ चे वार्षिक भविष्य

प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव, अभिनेत्री सविता मालपेकर, शोभा प्रधान, आंतरराष्ट्रीय कॅरमपटू महेंद्र तांबे यांचा वाढदिवस आहे. आज जन्मदिवस असणाऱ्या व्यक्तींना आगामी वर्ष कसे जाईल, याचा आचार्य कृष्णदत्त शर्मा यांनी घेतलेला हा आढावा...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Sep 2020, 7:54 am
प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव, अभिनेत्री सविता मालपेकर, शोभा प्रधान, आंतरराष्ट्रीय कॅरमपटू महेंद्र तांबे यांचा वाढदिवस आहे. यांसह आज जन्मदिवस असणाऱ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी उत्तमोत्तम हार्दिक शुभेच्छा...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ravi jadhav


आज जन्मदिवस असणाऱ्या व्यक्तींना आगामी वर्ष कसे जाईल, याचा आचार्य कृष्णदत्त शर्मा यांनी घेतलेला हा आढावा...

आगामी वर्षात आपल्यावर मंगळ, बुध, चंद्र या तीन ग्रहांचा प्रामुख्याने प्रभाव राहील. सप्टेंबर महिन्यात आयात-निर्यात क्षेत्रात काम करणाऱ्यांना काही ना काही समस्यांना सामोरे जावे लागेल. मात्र, ऑक्टोबर महिन्यात व्यापार, उद्योग, व्यवसायाच्या उत्तम संधी प्राप्त होऊ शकतील.

'या' ७ राशींना शुभलाभदायक दिवस; वाचा, आजचे राशीभविष्य

नोव्हेंबर महिन्यात आर्थिक पातळीवरील चिंता वाढू शकतील. डिसेंबर ते जानेवारी २०२१ या कालावधीत भाग्यवर्धक क्षेत्राशी संबंध येऊ शकेल. फेब्रुवारी महिन्यात नियोजन, बुद्धिचातुर्य, व्यवस्थापन यांच्या जोरावर कठीण वाटणारी कामे सुलभतेने पार पडू शकतील. मार्च व एप्रिल महिन्यात जीवनस्तर उंचावणाऱ्या घटना घडू शकतील.

मे महिन्यात कार्यालयात आपले कौतुक केले जाऊ शकेल. जून व जुलै महिन्यात चांगल्या गोष्टींसाठी पैसे खर्च होतील. मान, सन्मान, प्रतिष्ठा, कीर्ती वृद्धिंगत होईल. ऑगस्ट महिन्यात मानसिक शांतता आणि प्रसन्नता प्रदान करणाऱ्या घटना घडतील. आगामी वर्ष महिलांसाठी सुख, समृद्धी, सन्मान वाढवणारे ठरू शकेल. विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रीत करून ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्नशील राहावे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज