अ‍ॅपशहर

२३ जुलै २०२०-२१ चे वार्षिक भविष्य

ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, अभिनेता मिलिंद गुणाजी यांचा आज वाढदिवस आहे. आगमी वर्ष महिलांसाठी मनोवांच्छित इच्छा पूर्ण करणारे ठरू शकेल. आज जन्मदिवस असणाऱ्यांना आगामी वर्ष कसे जाईल, सांगताहेत आचार्य कृष्णदत्त शर्मा...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Jul 2020, 7:15 am
ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, अभिनेता मिलिंद गुणाजी यांचा आज वाढदिवस आहे. या दोघांसह आज जन्मदिवस असणाऱ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी उत्तमोत्तम हार्दिक शुभेच्छा...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mohan agashe


आज जन्मदिवस असणाऱ्यांना आगामी वर्ष कसे जाईल, याचा आचार्य कृष्णदत्त शर्मा यांनी घेतलेला हा आढावा...

आगामी वर्षात आपल्यावर गुरु ग्रहाचा प्रामुख्याने प्रभाव राहील. आपण घेत असलेली मेहनत व परिश्रम यांचे चीज होईल. जुलै महिन्यात त्याचे लाभ मिळण्यास सुरुवात होईल. ऑगस्ट महिन्यात कामाचे नियोजन आणि व्यवस्थापन यशाचा मार्ग प्रशस्त करतील. एखादा महत्त्वाचा निर्णय घेताना ज्येष्ठ मंडळींचा सल्ला अत्यंत उपयुक्त ठरू शकेल.

कन्या : प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल; आजचे राशीभविष्य

सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात प्रलंबित येणी प्राप्त होण्याचे योग आहेत. एखादी जुनी गुंतवणूक फायदा मिळवून देणारी ठरेल. काही व्यक्तींना रोजगाराच्या नवीन संधी प्राप्त होऊ शकतात. नोव्हेबर व डिसेंबर महिन्यात कामानिमित्त प्रवास संभवतात. काही व्यक्तींना या कालावधीत तीर्थाटनाचे योग आहेत. धार्मिक यात्रा लाभप्रत ठरू शकतात.

जानेवारी व फेब्रुवारी २०२१ या कालावधीत केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करणे हिताचे ठरेल. मार्च महिन्यात व्यापारी वर्गाने एखादी महत्त्वाकांक्षी योजना प्रत्यक्षात आणण्याविषयी हालचाली सुरू करणे हिताचे ठरेल. एप्रिल महिन्यात बुद्धी आणि कौशल्याचा वापर केल्यास काही समस्यांवर मात करू शकाल.

तुमची रास कोणती? 'हे' रुद्राक्ष धारण करणे ठरेल अत्यंत लाभदायक; वाचा

मे व जून महिना सामान्य राहील. आगामी वर्षात विवाहेच्छूक मंडळींना उत्तम स्थळे येतील. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. मेहनतीला पर्याय नाही, हे सूत्र विद्यार्थ्यांनी कायम लक्षात ठेवले पाहिजे. तरच अपेक्षित यशाचा मार्ग सुकर होईल. आगमी वर्ष महिलांसाठी मनोवांच्छित इच्छा पूर्ण करणारे आणि दाम्पत्य जीवन समृद्ध करणारे ठरू शकेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज