अ‍ॅपशहर

२८ ऑक्टोबर २०२०-२१ चे वार्षिक भविष्य

प्रसिद्ध शास्त्रीय गायक, अभिनेता आदित्य मोडक आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा वाढदिवस आहे. आज जन्मतिथी असणाऱ्या व्यक्तींना आगामी वर्ष कसे जाईल, याचा आचार्य कृष्णदत्त शर्मा यांनी घेतलेला हा आढावा...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Oct 2020, 6:50 am
प्रसिद्ध शास्त्रीय गायक, अभिनेता आदित्य मोडक आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा वाढदिवस आहे. आज जन्मदिवस असणाऱ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी उत्तमोत्तम हार्दिक शुभेच्छा...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aditya modak


आज जन्मतिथी असणाऱ्या व्यक्तींना आगामी वर्ष कसे जाईल, याचा आचार्य कृष्णदत्त शर्मा यांनी घेतलेला हा आढावा...

आगामी वर्षात आपल्यावर गुरु, चंद्र, शुक्र या तीन ग्रहांचा प्रामुख्याने प्रभाव असेल. वर्षाचा स्वामी चंद्र मानला गेला आहे. वर्षातील बहुतांश कालावधीत आपण अधिक व्यस्त राहू शकाल. मात्र, त्यामुळे बेसावध राहू नये. अन्यथा अपयश आणि निराशा पदरी पडू शकेल. ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात दिलेला शब्द पाळणे हिताचे ठरेल. हाती घेतलेली कामे वेळेत पूर्ण करावी. अन्यथा आपल्याबाबतचा विश्वास डळमळीत होऊ शकेल.

चंद्राचा मीन प्रवेश : 'या' ५ राशींना उत्तम दिवस; आजचे राशीभविष्य

डिसेंबर महिन्यात नियमित दिनक्रम, दिनचर्येत केलेला काही बदल हा उत्तम लाभदायक ठरू शकेल. जानेवारी ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत आरोग्य उत्तम राहू शकेल. मार्च व एप्रिल महिन्यात कठोर मेहनत आणि अथक परिश्रम घेतल्यानंतरच यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होऊ शकतील. खर्चात वाढ संभवते.

मे व जून महिन्यात एखाद्या मंगल कार्याच्या आयोजनाबाबत घरात चर्चा होऊ शकतील. मानसिक शांतता व प्रसन्नता लाभेल. जुलै महिन्यात तीर्थाटन, देशाटनाच्या योजना आखाल. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात ज्ञानात भर पडेल. मनोरंजनाकडे कल राहिल्यामुळे पैसे अधिक प्रमाणात खर्च होतील. मात्र, त्यामुळे आनंद, समाधानाची अनुभूती घेऊ शकाल. आगामी वर्ष विद्यार्थी वर्गासाठी उत्तम ठरू शकेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज