अ‍ॅपशहर

१७ नोव्हेंबर २०१८-१९ चे वार्षिक राशीभविष्य

या वर्षीचा राशीस्वामी सूर्य आहे. नोव्हेंबर अखेरपासून ते डिसेंबरपर्यंत उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. विरोधी पक्षाचा पराजय होईल. पुन्हा भाग्योदय होईल.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Nov 2018, 9:12 am
आचार्य कृष्णदत्त शर्मा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम yusuf-pathan


(भारतीय क्रिकेटपटू युसूफ पठाण याचा आज वाढदिवस आहे, त्याला आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्या सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा)

या वर्षीचा राशीस्वामी सूर्य आहे. नोव्हेंबर अखेरपासून ते डिसेंबरपर्यंत उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. विरोधी पक्षाचा पराजय होईल. पुन्हा भाग्योदय होईल.

नवीन ओळखीचे मैत्रीत रुपांतर झाल्याने आनंद होईल. जानेवारी- फेब्रुवारी २०१९ मध्ये व्यापारात जास्त गुंतवणूक केलेली फायदेशीर राहील. व्यावसायिक तसेच सामाजिक प्रतिस्पर्ध्यांसाठी तुम्ही डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. मार्च-एप्रिलमध्ये प्रतिष्ठितांकडून तुमची प्रशंसा होईल.

परिवारातील समस्येचे निराकरण होईल. मे ते जून मध्ये जवळ किंवा जवळपासच्या तीर्थयात्रेचा योग सार्थकी लागेल. जुलै-ऑगस्टमध्ये अधिक सक्रियतेमुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत मंगलकार्य ठरेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज