अ‍ॅपशहर

Daily panchang 06 june 2021: आज अपरा एकादशी तिथी, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घेऊया

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Jun 2021, 4:51 am
राष्ट्रीय मिती ज्येष्ठ १६, शक संवत् १९४३ वैशाख कृष्ण एकादशी रविवार, विक्रम संवत २०७८. सौर वैशाख मास प्रविष्टे २४, शव्वाल २४, हिजरी १४४२ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ६ जून २०२१ ई. सूर्य उत्तरायण, उत्तर गोल, ग्रीष्मऋतू.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम daily panchang 06 june 2021 apara ekadashi today panchang in marathi
Daily panchang 06 june 2021: आज अपरा एकादशी तिथी, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घेऊया


राहूकाळ संध्याकाळी ४ वाजून ३० मिनिट ते ६ वाजेपर्यंत. एकादशी तिथी संध्याकाळी ६ वाजून २० मिनिटांपर्यंत. त्यानंतर द्वादशी तिथीची सुरुवात. अश्विनी नक्षत्र अर्धरात्रीनंतर २ वाजून २७ मिनिटांपर्यंत. त्यानंतर भरणी नक्षत्राची सुरुवात.

शोभन योग दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून ३४ मिनिटांपर्यंत. त्यानंतर अतिगंड योगाची सुरुवात. बालव करण संध्याकाळी ६ वाजून २० मिनिटांपर्यंत. त्यानंतर तैतील करणाची सुरुवात. चंद्र दिवसरात्र मेष राशीत संचार करेल.

अपरा एकादशी २०२१ : जाणून घ्या मुहूर्त,महत्व आणि पूजाविधी

सूर्योदय: सकाळी ६-०२,
सूर्यास्त: सायं, ७-१३,
चंद्रोदय: पहाटे ३-१४,
चंद्रास्त: दुपारी ३-५६,
पूर्ण भरती: सकाळी ९-५८ पाण्याची उंची ३.६८ मीटर, रात्री ९-३८ पाण्याची उंची ३.५२ मीटर,
पूर्ण ओहोटी: पहाटे ३-२५ पाण्याची उंची १.३६ मीटर, दुपारी ३-२९ पाण्याची उंची २.०६ मीटर.

दिनविशेष: अपरा एकादशी, शिवराज्याभिषेक सोहळा, किल्ले रायगड.

साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य ०६ जून ते १२ जून २०२१ : या राशींना आर्थिक शुभ लाभ

आजचे शुभ मुहूर्त :

अभिजित मुहूर्त दुपारी ११ वाजून ५२ मिनिट ते १२ बवाजून ४८ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३९ मिनिट ते ३ वाजून ३५ मिनिटांपर्यंत असेल. निशिथ काळ मध्यरात्री १२ ते १२ वाजून ४० मिनिटांपर्यंत. गोधुली वेळ संध्याकाळी ७ वाजून ३ मिनिट ते ७ वाजून २७ मिनिटांपर्यंत. अमृत काळ संध्याकाळी ६ वाजून २२ मिनिट ते ८ वाजून १० मिनिटांपर्यंत. सर्वार्थ सिद्धी योग सकाळी ५ वाजून २३ मिनिट ते दुसऱ्या दिवशी सकाळी २ वाजून २८ मिनिटांपर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त :

राहुकाळ संध्याकाळी ४ वाजून ३० मिनिट ते ६ वाजेपर्यंत. दुपारी १२ ते १ वाजून ३० मिनिटांपर्यंत यमगंड असेल. दुपारी ३ वाजून ३० मिनिट ते ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत गुलिक काळ असेल. वर्ज्य काळ रात्री ९ वाजून ५८ मिनिट ते ११ वाजून ४६ मिनिटांपर्यंत असेल. दुमुहुर्त काळ संध्याकाळी ५ वाजून २६ मिनिट ते ६ वाजून २१ मिनिटांपर्यंत.

आजचा उपाय : गायीला गुळ खायला द्या. आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करा.

-आचार्य कृष्णदत्त शर्मा
प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये आनंद हवा, ही ५ अनमोल रत्ने वापरुन पहा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज