अ‍ॅपशहर

Today panchang 13 october 2021 : आज नवरात्र अष्टमी, मुहूर्त आणि शुभ योग जाणून घ्या

राष्ट्रीय मिती अश्विन २१, शक संवत १९४३, अश्विन शुक्ल अष्टमी, बुधवार, विक्रम संवत २०७८. सौर अश्विन मास प्रविष्टे २८, रवि उल्लावल ०६, हिजरी १४४३ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख १३ ऑक्टोंबर २०२१...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Oct 2021, 7:06 am
राष्ट्रीय मिती अश्विन २१, शक संवत १९४३, अश्विन शुक्ल अष्टमी, बुधवार, विक्रम संवत २०७८. सौर अश्विन मास प्रविष्टे २८, रवि उल्लावल ०६, हिजरी १४४३ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख १३ ऑक्टोंबर २०२१ ई. सूर्य दक्षिणायन, दक्षिण गोल, शरदऋतू.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम daily panchang in marathi today panchang 13 october 2021 navratri ashtami tithi maha ashtami shubh yog and muhurta
Today panchang 13 october 2021 : आज नवरात्र अष्टमी, मुहूर्त आणि शुभ योग जाणून घ्या


राहूकाळ मध्यान्ह १२ ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत. अष्टमी तिथी रात्री ०८ वाजून ०८ मिनिटांपर्यंत त्यानंतर नवमी तिथीची सुरुवात.

पूर्वाषाढ नक्षत्र पूर्वान्ह १० वाजून १९ मिनिट त्यानंतर उत्तराषाढ नक्षत्राची सुरुवात. सुकर्मा योग अर्धरात्रीनंतर ०३ वाजून ४७ मिनिटांपर्यंत त्यानंतर धृतिमान योगाची सुरुवात. विष्टी करण संध्याकाळी ०८ वाजून ५८ मिनिटांपर्यंत त्यानंतर बालव करणाची सुरुवात. चंद्र संध्याकाळी ०४ वाजून ०६ मिनिटांपर्यंत धनु नंतर मकर राशीत संचार करेल.

नवरात्रोत्सव : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे, दर्शनाचा लाभ घ्या

सूर्योदय: सकाळी ६-३३,
सूर्यास्त: सायं. ६-१६,
चंद्रोदय: दुपारी १-२९,
चंद्रास्त: रात्री १२-४०,
पूर्ण भरती: पहाटे ४-५६ पाण्याची उंची ३.८० मीटर, सायं. ५-०२ पाण्याची उंची ३.१२ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ११-३८ पाण्याची उंची २.२४ मीटर, रात्री ११-२५ पाण्याची उंची १.४६ मीटर.

दिनविशेष: दुर्गाष्टमी, महाष्टमी उपवास.

'या' राशीसोबत कधीही मन मोकळे करू नका, अडचणी येऊ शकतात

आजचे शुभ मुहूर्त :

विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३ मिनिट ते २ वाजून ४९ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री ११ वाजून ४२ मिनिट ते १२ वाजून ३२ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ४२ मिनिट ते ६ वाजून ०६ मिनिटांपर्यंत. अमृत काळ मध्यरात्री ०३ वाजून २३ मिनिटे ते ०४ वाजून ५६ मिनिटांपर्यंत. ब्रह्म मुहूर्त सकाळी ०४ वाजून ४१ मिनिट ते ०५ वाजून ३१ मिनिटांपर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त :

राहूकाळ १२ ते १ वाजून ३० मिनिटांपर्यंत. सकाळी ७ वाजून ३० मिनिट ते ९ वाजेपर्यंत गुलिक काल असेल. दुमुहुर्त काळ दुपारी ११ वाजून ४४ मिनिट ते १२ वाजून ३० मिनिटांपर्यंत. भद्रा काळ सकाळी ६ वाजून २१ मिनिट ते ०८ वाजून ५४ मिनिटांपर्यंत.

आजचा उपाय : दुर्गा सप्तशतीच्या पाचव्या अध्यायाचा पाठ करा. गौरी मातेला सौभाग्याच्या वास्तू भेट द्या.

-आचार्य कृष्णदत्त शर्मा
श्वासात अग्नी असलेल्या कालरात्रि देवीचे खास महत्त्व

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज