>> बेजन दारुवाला
मेष : मन प्रसन्न राहील. मित्र-परिवासासोबत सुग्रास भोजनाचा आनंद घ्याल. आर्थिक लाभ होईल.
वृषभ : नव्या कार्याचा शुभारंभासाठी उत्तम दिवस. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. सरकारी कामे पूर्ण होतील.
मिथुन : सावध राहा. नव्या कार्याचा शुभारंभ टाळा. राग आणि चुकीचे वर्तन संकटात टाकतील.
कर्क : अस्थिर विचारांनी मनस्थिती बिघडेल. नोकरी-व्यवसायात स्पर्धात्मक वातावरण राहील, त्यात यशस्वी व्हाल.
सिंह : मन आणि शरीर अस्वस्थ होईल. परिवारासोबत मतभेद झाल्याने मन उदास होईल. संभ्रम आणि वाद-विवादापासून दूर राहा.
कन्या : नव्या कार्याचा शुभारंभ करु नका. प्रवासात विघ्न येतील. शक्य असल्यास प्रवास टाळा.
तूळ : बौद्धिक, तार्किक, विचार-विनिमय आणि लेखन कार्यासाठी दिवस उत्तम आहे. वैवाहिक संबंध सुधारतील.
वृश्चिक : लाभापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्या. नोकरी-व्यवसायात पदोन्नत्तीचे संकेत मिळतील.
धनु : मुलांच्या आरोग्याची चिंता सतावेल. नोकरदारांना वरिष्ठ आणि सहकाऱ्यांचे सहकार्य मिळणार नाही.
मकर : कौटुंबिक वाद-विवाद होतील. आकस्मित घटनांमुळे उत्साह मावळेल. स्थावर मालमत्ता, वाहनांसंबंधी समस्या निर्माण होतील.
कुंभ : वाकचातुर्यामुळे कामे पूर्ण होतील. वाकचातुर्य अनेकांना प्रभावित करेल. शुभकार्य सुरू करु नका.
मीन : व्यापार-व्यवसायात वाढ होईल. परिवारात सुख-शांती नांदेल. कार्यकर्त्यांचे सहकार्य मिळेल. प्रतिस्पर्धांवर विजय मिळवाल.