अ‍ॅपशहर

Durga Devi Aarti शारदीय नवरात्रोत्सव : दुर्गा देवीची आरती

अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या कालावधीत नवरात्रोत्सव साजरे केले जाते. कोणत्याही पूजेनंतर म्हणावयाची दुर्गा देवीची आरती जाणून घ्या...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Oct 2020, 11:50 am
अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या कालावधीत नवरात्रोत्सव साजरे केले जाते. अवघ्या देशभरात आपपल्या पद्धती, कुळधर्म, कुळाचार, परंपरा यांनुसार देवीचे पूजन, व्रताचरण, आराधना, उपासना, नामस्मरण, जप, होम-हवन केले जाते. कोणत्याही पूजेनंतर म्हणावयाची दुर्गा देवीची आरती जाणून घ्या...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम durga devi aarti


नवरात्रोत्सव : दुर्गा देवीच्या सर्व नऊ स्वरुपांची माहिती, महती व महत्त्व

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारीं जन्ममरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ॥

जय देवी जय देवी महिषासुरमथनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥

त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऐसे नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥
साही विवाद करितां पडिले प्रवाही ।
ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥ २ ॥

प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां ।
क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा ।
नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥ ३ ॥

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज