अ‍ॅपशहर

ईद-उल-फितरः रमजान ईदच्या मराठीत द्या शुभेच्छा

रमजानचा पवित्र महिना अंतिम टप्प्यात आहे. संपूर्ण महिनाभर ठेवण्यात आलेले रोजे रमजान ईद दिनी सोडले जातात. आपल्याकडे २५ मे २०२० रोजी चंद्रदर्शनानंतर ईद साजरी होण्याची शक्यता आहे. ईद-उल-फितर म्हणजेच रमजान ईदनिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना मराठीतून द्या शुभेच्छा...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 May 2020, 5:15 pm
मुस्लिम बांधवांमध्ये सर्वांत पवित्र महिना मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्याचे अखेरचे दोन दिवस राहिले आहेत. मुस्लिम कॅलेंडरमध्ये चंद्रदर्शनाला महत्त्व असून, चंद्रदर्शन झाल्यावर रमजान ईद संपूर्ण जगभरात साजरी केली जाणार आहे. २५ मे २०२० रोजी ईद-उल-फितर म्हणजेच रमजान ईद साजरी होण्याची शक्यता आहे, असे सांगितले जात आहे. ईद निमित्त खाद्यपदार्थांची रेलचेल असते. दूध, सुकामेवा आणि शेवया या पासून बनवलेल्या शीर खुरमाचे विशेष महत्त्व असते. रमजान ईद दिनी गळाभेटीला विशेष महत्त्व असते. मात्र, करोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर घरीच राहून ईद साजरी करावी, असे आवाहन केले जात आहे. मुस्लिम बांधव सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत आपापल्या घरी ईद साजरी करणार आहेत. आपापल्या घरीच नमाज पठण केले जाणार असल्याचे समजते. आपणही आपल्या मुस्लिम बांधवांना ईदनिमित्त मराठीतून शुभेच्छा देऊया...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ramadan eid


पाहाः 'हे' आहेत मे महिन्यातील मुख्य सण-उत्सव

सर्व मुस्लिम बांधवाना रमजान ईदच्या मनापासून
हार्दिक शुभेच्छा... ईद मुबारक!

अल्लाह ताला पूर्ण करो तुमच्या सर्व इच्छा,
तुमच्या घरात आनंद नांदो हीच सदिच्छा,
सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा...
ईद मुबारक!

ईद-उल-फितरः चंद्रदर्शनानंतर साजरी होणार रमजान ईद

ईदनिमित्त तुम्हाला सर्वांना ऐश्वर्य लाभो,
ईदच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा...
ईद मुबारक!

बंधुत्वाचा संदेश देऊया,
विश्वबंधुत्व वाढीस लावूया,
ईद दिनी हीच करून मनी इच्छा,
सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा...
ईद मुबारक!

ईद-उल-फितरः बंधुत्वाचा संदेश देणारी रमजान ईद

धर्म, जात यापेक्षाही मोठी
असते शक्ती माणुसकीची...
एकमेकांची गळाभेट घेऊन
शुभेच्छा देऊयात रमझान ईदची...
ईद मुबारक!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज