अ‍ॅपशहर

Janmashtami Wishes 2022: श्रीकृष्ण जयंती निमित्त मित्र, मैत्रीण आणि नातेवाईकांना 'अशा' द्या शुभेच्छा

Janmashtami Wishes in Marathi: गोपाळकाला म्हणजे आध्यात्मिकता, सामाजिकता, एकता आणि व्यवस्थापन कौशल्य दाखवणारा सण. मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रावण वद्य अष्टमीला रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला म्हणून याच दिवशी कृष्णजन्माष्टमी साजरी केली जाते. श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साह आणि मांगल्याचे प्रतीक आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर आपल्या मित्र आणि नातेवाईकांना अशा द्या शुभेच्छा...

Authored byप्रियंका वाणी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Aug 2022, 10:29 am
Gokulashtami 2022 Quotes in Marathi: श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला असे मानले जाते. मध्य प्रदेशात आणि उत्तर भारताच्या बऱ्याचशा भागात पौर्णिमान्त महिना असलेले पंचांग वापरात असल्याने या दिवशी तेथे भाद्रपद कृष्ण अष्टमी येते. दरवर्षी या तिथीबाबत संभ्रम निर्माण होऊन जन्माष्टमी दोन दिवस साजरी केली जाते. श्रीकृष्णाची विविध रूपे प्रेरणादायी आहेत. पहिल्या दिवशी श्रीकृष्ण जयंती साजरी केली जाते आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडून गोकुळाष्टमी साजरी करतात. या श्रीकृष्ण जन्माष्टमीला आप्तस्वकीयांना शुभेच्छा देण्यासाठी काही खास शुभेच्छा संदेश.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Janmashtami Wishes 2022 in Marathi
जन्माष्टमी २०२२ शुभेच्छा


"रंगात रंग तो शाम रंग
कृष्णजन्माष्टमीत सर्व होई दंग
लोणी, खडीसाखरेचा नैवेद्य
गोपाळकाला घेऊनी जाई भक्त.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा"

Vastu Tips: बाळकृष्ण ते चक्रधर, जाणून घ्या श्रीकृष्णाच्या विविध रुपांचे वास्तुदिशेनुसार कसे लावावे फोटो

"राधा ची भक्ति, बांसुरी ची गोडी
लोणी चा स्वाद आणि,गोपीं चा रास
सर्व मिळून साजरा करू
गोकुळाष्टमी चा दिवस खास.
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा"

"ढगांच्या आडून चंद्र हासला,
आकाशी ताऱ्यांचा रास रंगला,
कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला.
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!"

Shri Krishna Jayanti 2022 : गोकुळाष्टमीला राशीनुसार भगवान श्रीकृष्णाला हे पदार्थ अर्पण करा

"जसा आनंद नंदच्या घरी आला
तसा तुमच्या आमच्याही येवो
प्रत्येक घरी कृष्ण जन्म होवो
जन्माष्टमीचा हार्दिक शुभेच्छा"

"प्रसाद ठेवूनी स्मरण तयांचे गोड मानूया
पून्हा नव्याने उत्साह साजरा करूया
दहीहंडी फोडू या गोपाळकाला खाऊ या
जन्माष्टमीला निमीत्त करूनी कान्हाचे
आठवणी आपण रंगवूया...
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा"

जन्माष्टमीच्या पूजेसाठी 'हे' ४४ मिनिटे खूप खास, 'या' शुभ योगात पूजा करणे लाभदायक
लेखकाबद्दल
प्रियंका वाणी
महाराष्ट्र टाइम्स मध्ये भविष्य सेक्शनसाठी कंन्टेंट रायटर म्हणून २ वर्षापासून काम करत आहे. वैदिक ज्योतिष, आर्थिक भविष्य, राशीभविष्य, अंक ज्योतिष, टॅरो कार्ड, पंचांग, धार्मिक विषय आणि, सण उत्सवासंबंधी अचुक माहिती घेऊन ज्ञान आणि अनुभवानुसार योग्य माहिती वाचकांपर्यंत पोहचवते. इलेक्ट्रॉनिक मीडिया चॅनल मध्ये काम करण्याचा अनुभव आहे, वॉइस ओवर देण्याचाही अनुभव आहे. वाचन करण्याची आवड आहे. धार्मिक, आध्यात्मिक कथा वाचणे आणि स्वरचित कविता लिहीण्याचीही आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज