अ‍ॅपशहर

Happy Rose Day 2024 Wishes: रोझ डे च्या गुलाबी शुभेच्छा देण्यासाठी 'या' संदेशांचा होईल उपयोग, वाचा आणि पाठवा

Rose Day Wishes 2024 in Marathi : फेब्रुवारीचा महिना असं म्हणतात की प्रेमाचा महिना. कारण या महिन्यात वॅलेटाइन डे साजरी होतात. ७ तारखेपासून रोझ डे ने व्हॅलेंटाइन विकची सुरवात होत आहे. तुम्हाला प्रत्येक डे ला आपल्या प्रेमाला, नात्याला शुभेच्छांनी साजरे करायला आवडेलच. तर रोझ डे निमीत्त स्टेटस ठेवायचंय किंवा आपल्या जोडीदाराला शुभेच्छा द्यायच्या आहेत तर 'या' खास शुभेच्छा वाचा, स्टेटस ठेवा आणि पाठवा.

Authored byप्रियंका वाणी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Feb 2024, 10:36 am
फेब्रुवारी महिना सुरू झाल्यानंतर प्रेमी युगुल ‘व्हेलेंटाईन डे’सह ‘व्हेलेंटाईन विक’ची सुद्धा आतुरतेनं वाट पाहतात. ७ फ्रेबुवारीपासून ते १३ फेब्रुवारीपर्यंत ‘व्हेलेंटाईन विक’ साजरा केला जातो. ‘रोझ डे’पासून व्हेलेंटाईन विकची सुरुवात होते. गुलाबाचे फुल प्रेमाचे प्रतीक मानलं जातं. यामुळेच व्हेलेंटाईन विकची या दिवसापासून सुरुवात होते, असे म्हटलं जातं. या दिवशी प्रेमी जोडपी एकमेकांना गुलाबाचे फुल देऊन आपले प्रेम व्यक्त करतात. केवळ कपलच नव्हे तर हल्ली मित्रमैत्रिणी, कुटुंबातील सदस्य देखील केवळ आनंद, मौज म्हणून व्हेलेंटाईन विक साजरा करतात. भेट होणे हल्ली अनेक कारणांमुळे शक्य होत नाही अशावेळी रोझ डे निमित्त अशा द्या शुभेच्छा.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम happy rose day 2023 wishes quotes in marathi 7 feb whatsapp status and messages
Happy Rose Day 2024 Wishes: रोझ डे च्या गुलाबी शुभेच्छा देण्यासाठी 'या' संदेशांचा होईल उपयोग, वाचा आणि पाठवा


रोझ डे निमीत्त शुभेच्छा

"रोझ डे निमित्त देतो मी तुला हे गुलाबाचे फूल
तुला पाहता क्षणी पडली मला तुझी भूल
हॅपी रोझ डे"

"एक रोझ त्यांच्यासाठी जे भेटत नाहीत रोज रोज,
परंतु आठवतात मात्र रोज रोज…
Happy Rose Day 2024!"

हॅपी रोझ डे

"दिलेलं वचन पूर्ण करायचंय,

सुंदर गुलाब तुझ्यासाठी आणायचंय,

नात्यामध्ये आपल्या आहे किती प्रेम

हे तुला गुलाबाचे फुल देऊन सांगायचंय

हॅपी रोझ डे"


"रोझ डे निमित्त आणली मी तुझ्यासाठी फुलं गुलाबाची

जी सदैव साक्ष देतील तुझ्या भेटीची

हॅपी रोझ डे"

रोझ डे विशेष

"जोवर मनाला आशेचे पंख आहेत,


जोवर भावनांना फुलांचे गंध आहेत,
ह्रदयामध्ये तुझेच गीत आहे, आणि
डोळ्यांसमोर खुले आकाश आहे
तोवर येणारा प्रत्येक क्षण तुझाच आहे.
हॅपी रोझ डे"

"फुलांचा सुगंध दरवळला
व्हॅलेंटाइन विकचा आठवडा आला
मनी भावना तुझ्या घेऊनी,
साथसोबत तुझी रंगवून,
मला तुझे वेड लागले
गुलाबाचे फुल स्विकार
माझ्या प्रेमाला कळव होकार
हॅपी रोझ डे"

Happy Rose Day

"एक गुलाब.... आपल्या मैत्रीसाठी!
एक गुलाब...आपल्यातील प्रेमासाठी!
एक गुलाब... आपल्या नात्यातील गोडव्यासाठी ,
एक गुलाब... फक्त आणि फक्त तुझ्यासाठी!
Happy Rose Day!"

"जीवनाच्या मार्गावर गुलाब फुलत राहो,
तुमच्या नजरेत हास्य चमकत राहो,
तुमच्या पावलोपावली ख़ुशी ची लहर येत राहो,
तुम्हाला गुलाब दिवसाच्या शुभेच्छा"

रोझ डे

"गुलाबी गुलाब तुझ्या गुलाबी ओठांशी बोलताय


हळूच गालात हास्याची खडी पाडताय,
मनमोहक तुझे ते रूप पाहून
गुलाबाचे काटेही घायाळ होताय,
साथ तुझी मला मिळेल का?
हे गुलाब स्विकारून सांग
तुला हवं ते मला माग.
हॅपी रोझ डे"

"मला तुझंच बनून कायमचं राहायचंय,
हट्ट मााझे पुरवून घ्यायचेय,
मला हवं ते देशील ना ?
सांग हे गुलाब स्विकारून
सप्तपदीत घेतलेले वचन निभावशील ना?
हॅपी रोझ डे"
लेखकाबद्दल
प्रियंका वाणी
महाराष्ट्र टाइम्स मध्ये भविष्य सेक्शनसाठी कंन्टेंट रायटर म्हणून २ वर्षापासून काम करत आहे. वैदिक ज्योतिष, आर्थिक भविष्य, राशीभविष्य, अंक ज्योतिष, टॅरो कार्ड, पंचांग, धार्मिक विषय आणि, सण उत्सवासंबंधी अचुक माहिती घेऊन ज्ञान आणि अनुभवानुसार योग्य माहिती वाचकांपर्यंत पोहचवते. इलेक्ट्रॉनिक मीडिया चॅनल मध्ये काम करण्याचा अनुभव आहे, वॉइस ओवर देण्याचाही अनुभव आहे. वाचन करण्याची आवड आहे. धार्मिक, आध्यात्मिक कथा वाचणे आणि स्वरचित कविता लिहीण्याचीही आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज