अ‍ॅपशहर

Shivji ki Aarti In marathi श्रावणी सोमवारः आरती शंकराची

श्रावण महिना शिवपूजनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. श्रावणी सोमवारी शिवशंकरावर जलाभिषेक, रुद्राभिषेक केला जातो. वाचा, शिवपूजनानंतर म्हणावयाची शंकराची आरती...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Jul 2020, 11:50 am
श्रावण सोमवारनिमित्ताने शंकराची आरती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम vyadeshwar


लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा।
विषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा।।
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा।
तेथुनियां जळ निर्मळ वाहे झुळझुळां ।।१।।

जय देव जय देव जय श्रीशंकरा।।
आरती ओवाळूं तुज कर्पुगौरा ।।ध्रु.।।

कर्पुगौरा भोळा नयनीं विशाळा।
आर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा।
विभुतीचे उधळण शितिकंठ नीळा।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ।। जय. ।।२।।

देवीं दैत्यीसागरमंथन पैं केले।
त्यामाजी अवचित हळाहळ उठिले।
ते त्वां असुरपणे प्राशन केलें।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले।। जय. ।।३।।

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी।
शतकोटीचे बीज वाचें उच्चारी।
रघुकुलतिलक रामदासा अंतरी।।
जय देव जय देव जय श्रीशंकरा।।४।।

महत्वाचे लेख