अ‍ॅपशहर

लंकापती रावणाने शनी देवांना कैद करण्याचे नेमके कारण काय? वाचा

रावणाशिवाय रामायण पूर्ण होऊ शकत नाही. प्रचंड विद्वान, पराक्रमी, अभ्यासू असूनही अहंकारामुळे रावणाचा सर्वनाश झाला, असे सांगितले जाते. रावण ज्योतिष विद्येतही पारंगत होता. त्याने सर्व नवग्रहांना कैदेत ठेवले होते. यामागील नेमके कारण काय? जाणून घ्या...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Jul 2020, 4:14 pm
रामायण हे एक अद्भूत काव्य आहे. वाल्मिकी रामायणामधील अनेक गोष्टी आजच्या काळातही आपल्याला आश्चर्यचकीत करतात. दोन युगे लोटली, तरी रामायणाची मोहिनी आजही तशीच आहे. रामायण हे रावणाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. रावणवधासाठी श्रीविष्णूंनी रामवतार घेतल्याचे सांगितले जाते. रावण हा अतिशय विद्वान, बुद्धिवंत, चतुर आणि पराक्रमी होता. मात्र, विनाशकाले विपरीत बुद्धी, या उक्तीप्रमाणे अहंकाराने त्याला त्याच्या वधापर्यंत आणले, असे सांगितले जाते. न्यायाची देवता मानल्या गेलेल्या शनीला रावणाने का कैद करून ठेवले होते? शनी देवतेची सुटका कोणी केली? जाणून घेऊया...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ravana and shani


सूर्य-शनी समसप्तक योग: 'या' सहा राशींना जबरदस्त लाभ; वाचा

लंकापती रावण एक अहंकारी राक्षस होता. तो फक्त देवानांच नव्हे तर संपूर्ण नवग्रहांनाही त्रास देत असे. रावण ज्योतिष विद्येत अतिशय पारंगत होता. रावणाने नवग्रहांना लंकेत डांबून ठेवले होते. मेघनादच्या जन्मावेळी कोणत्याही ग्रहांचा प्रतिकूल प्रभाव होऊ नये, यासाठी आपल्या मायावी शक्तीने सर्व नवग्रहांना रावणाने कैद करून ठेवले होते. मेघनाद अजेय आणि अमर व्हावा, हा त्यामागील मुख्य उद्देश होता.

महाभारतातील एक योद्धा आजही 'या' शिवमंदिरात दर्शनाला येतो? वाचा

रावणाच्या ताकदीसमोर नवग्रह हताश झाले होते. तेव्हा शनीने एक युक्ती केली. मेघनादच्या जन्मापूर्वी शनीने आपली जागा बदलली. शनीने केलेल्या स्थानबदलामुळे मेघनाद अमरत्वला प्राप्त होऊ शकला नाही. रावणाला हे समजल्यावर त्याने चिडून शनीच्या पायावर आपल्या गदेने जोरदार प्रहार केला. एवढेच नव्हे, तर शनीची वक्रदृष्टी लंकेवर आणि कुटुंबावर पडू नये, यासाठी मायावी शक्तीच्या जोरावर शनी देवाला सिंहासनाखाली पालथे टाकून दिले. याचा फायदा रावणाला झाला आणि त्याने सोन्याची लंका विकसित केली. रावण एवढा अहंकारी होता की, सिंहासनावर बसताना आपले पाय ठेवण्यासाठी तो पालथे पडलेल्या शनीचा वापर करत असे. सिंहासनावरून उठताना आणि बसताना शनीच्या अंगावर पाय देऊन त्यांना दाबत असे.

नंदीशिवाय शिवमंदिर? 'या' ठिकाणचे रहस्य ऐकून व्हाल थक्क; वाचा

कालांतराने सीतेचा शोध घेण्यासाठी मारुती लंकेत आले. हनुमंतांनी बुद्धी आणि शक्तीचा वापर करून कैदेत असलेल्या ग्रहांना मुक्त केले. मात्र, शनीदेव अडकले. हनुमानाने लंकादहन करण्यास सुरुवात केली, तेव्हा सगळीकडे हाहाःकार माजला. त्याच संधीचा फायदा घेऊन शनीदेव तेथून निसटले. मात्र, बाहेर पडताना शनीदेवाने आपली वक्रदृष्टी लंकेवर टाकली आणि सोन्याच्या सर्वनाश झाला. मेघनादासह रावणाचा वध झाला.

श्रावणात नेमके कोणते रुद्राक्ष धारण करणे ठरते फायदेशीर?; वाचा

हनुमानाने शनीदेवांना रावणाचा कैदेतून मुक्त केले. हनुमानाचे हे उपकार शनीने सदैव स्मरणात ठेवले. म्हणूनच शनीची महादशा, साडेसाती, ढिय्या यांचा प्रभाव कमी करायचा असल्यास हनुमानाची उपासना, नामस्मरण, आराधना करण्याचा सल्ला दिला जातो.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज