अ‍ॅपशहर

जीवनात येणारा संघर्षकाळ दर्शवतात या हस्तरेषा,वेळीच करा हा उपाय

हस्तरेषा देतात हे संकेत,वेळीच व्हा सावध

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Mar 2021, 8:00 am
सुख असो वा दुःख या दोन्ही गोष्टींचे संकेत वेळेआधीच आपल्या हातावरील रेषा आपल्याला देत असतात.हस्तरेषा शास्त्रानुसार जर हे संकेत योग्य वेळी जाणून घेतले तर अनेक समस्यांपासून आपण स्वतःला दूर ठेवण्यात यशस्वी होऊ शकतो.आपल्या हातावर अश्या काही रेषा आहेत ज्या अचानकपणे दिसू लागल्यास आयुष्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता असते असे मानले जाते.परंतु यावर वेळीच उपाय केल्यास या समस्यांपासून आपल्याला मुक्ती देखील मिळू शकते.चला तर मग याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hastharekha obstacles and signs of conflict in palmistry
जीवनात येणारा संघर्षकाळ दर्शवतात या हस्तरेषा,वेळीच करा हा उपाय


तळहातावरील रेषांची जर असेल ही स्थिती :

हस्तरेषा शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या हातावर बुध पर्वत उच्च असून त्याठिकाणी फुलीचे चिन्ह म्हणजे क्रॉस तयार झाले असेल किंवा अनेक रेषा तिथून निघून पुढे एकमेकींना छेदताना नजरेस पडत असतील तर हा अशुभ संकेत समजला जातो.असे मानले जाते की या परिस्थितीत तुमच्या जीवनात मोठा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता असते.याशिवाय एखाद्या व्यक्तीच्या हातावरील रेषांच्या पर्वतावर एकही फुगवटा दिसत नसेल तर ही स्थिती तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणाऱ्या भयंकर संकटाची सूचना देते.त्यामुळे हातावरील रेषांच्या पर्वताला फुगवटा असणे अत्यंत महत्त्वाचे असते.

जर भाग्यरेषेवर दिसत असेल असे काही :

हस्तरेषा शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या हातावरील भाग्यरेषेवर फुलीचे चिन्ह म्हणजे क्रॉस तयार झाले असेल तर हासुद्धा एक वाईट संकेत आहे.भाग्योदय होता होता अचानकपणे संकट येऊन नशिबाची साथ सुटण्याचा हा संकेत मानला जातो.याशिवाय आर्थिक स्थिती खराब होण्याचेही संकेत यातून मिळतात.तसेच जर एखाद्या व्यक्तीच्या हातावर शनी पर्वत किंवा सूर्य पर्वत उंच असेल तर हा अत्यंत शुभ संकेत मानला जातो.परंतु याठिकाणी फुलीचे चिन्ह तयार झाल्यास मात्र समजून जावे की आपला वाईट काळ लवकरच सुरू होणार आहे.

जर हातावर याठिकाणी असतील या गोष्टी :

हस्तरेखा शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या हातावर अनेक ठिकाणी फुलीचे चिन्ह म्हणजे क्रॉस तयार झाले असेल तर हा फारच अशुभ संकेत आहे.असे म्हणतात की जीवनात येणाऱ्या अमर्यादित संघर्षाचे हे सूचक आहे.कित्येकवेळा या स्थितीमुळे हातांवरील शुभ रेषांमध्येही अडथळे निर्माण होतात.त्यामुळे अश्याप्रकारे जर तुम्हाला कधी आपल्या हातावर अनेक ठिकाणी फुलीचे चिन्ह दिसले तर त्वरित एखाद्या जाणकाराकडून सल्ला घ्यावा.


साप्ताहिक राशीभविष्य : दि. ७ ते १३ मार्च २०२१

अशुभ रेषांपासून अशी मिळवता येईल मुक्ती :

जर कधी अचानकपणे तुमच्या हातावर अनेक फुल्यांची चिन्हे दिसू लागली तर या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये.त्वरित आपल्या दिनचर्येत बदल करावा.व एखाद्या जाणकाराकडून सल्ला घेऊन योग्य ती उपाययोजना करावी.दिव्यांग व्यक्ती व गरजू व्यक्तींना शक्य तितकी मदत करावी.वृद्ध व्यक्तींची सेवा करावी.दवाखान्यामध्ये मोफत औषध वाटप करावे.उपाशी व्यक्तींना पोटभर खाऊ घालावे.मनात कोणाविषयीही ईर्ष्या व द्वेष ठेवू नये.असे केल्यास तुमच्यावर ईश्वराची कृपा राहील व अशुभ काळ देखील शुभ होऊन जातो असे मानले जाते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज