अ‍ॅपशहर

Shani Dev Never Effects On These People 'या' व्यक्तींवर पडत नाही शनीचा प्रतिकूल प्रभाव; वाचा, नेमके कारण

नवग्रहांपैकी सर्वाधिक क्रूर ग्रह शनीला मानले गेले आहे. शनीचा प्रतिकूल प्रभाव काही व्यक्तींवर पडत नाही, असे म्हटले जाते. त्यामागे काय कारण सांगितले जाते? जाणून घेऊया...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Dec 2020, 12:23 am
ज्योतिषशास्त्र हे नवग्रहांवर आधारित असून, ग्रहांची स्थिती, त्यांचे चलन, जन्मकुंडलीतील स्थान यांवरून एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील भविष्यकालीन घटना, स्वभाव, व्यक्तिमत्त्व अशा अनेक गोष्टींचा अंदाज बांधता येतो. नवग्रहांपैकी सर्वाधिक क्रूर ग्रह शनीला मानले गेले आहे. शनी न्यायाची देवता असून, प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फलप्रदान करतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. मात्र, शनीचा प्रतिकूल प्रभाव काही व्यक्तींवर पडत नाही, असे म्हटले जाते. नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींवर शनी महाराजांची अवकृपा होत नाही आणि त्यामागे काय कारण सांगितले जाते? जाणून घेऊया...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Which house is good for Saturn


८०० वर्षांनी गुरु-शनी दुर्मिळ योग; नेमके काय घडेल? जाणून घ्या

शनीचे कुंडलीतील स्थान

शनी न्यायाची देवता मानली जाते. शनीचे कुंडलीतील स्थान आणि त्याचा पडणारा प्रतिकूल प्रभाव यांवर अनेक गोष्टी अवलंबून असतात. शनीची ढिय्या दशा आणि साडेसाती ही सर्वाधिक प्रभावशाली मानली जाते. शनी कष्टकारक मानला जातो. शनीची कृपादृष्टी लाभणे सर्वोत्तम शुभ लाभदायक मानले जाते. सुख, समृद्धी, भरभराट, आनंद, समाधान, धन, वैभव, करिअर, कार्यक्षेत्र अशा अनेक गोष्टींवर शनीचा प्रभाव पडू शकतो.

५९ वर्षांनी मकर राशीत शनी-गुरु महायुती; देश-जगात मोठे बदल!

शनीची साडेसाती आणि ढिय्या प्रभाव

आताच्या घडीला मिथुन आणि तुळ राशीच्या व्यक्तींची ढिय्या दशा सुरू आहे. तसेच धनु, मकर आणि कुंभ या तीन राशीच्या व्यक्तींची साडेसाती सुरू आहे. धनु राशीच्या व्यक्तींचा अखेरचा टप्पा, मकर राशीच्या व्यक्तींचा मधला टप्पा, तर कुंभ राशीच्या व्यक्तींचा पहिला टप्पा साडेसातीचा सुरू आहे. शनीची साडेसाती आणि ढिय्या सुरू असलेल्या व्यक्तींना काही उपाय सांगितले जातात. त्यामुळे शनीचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत मिळते, अशी मान्यता आहे.

आपल्या जन्मकुंडलीत शनी कोणत्या स्थानी आहे? वाचा, प्रभाव व परिणाम

शनी आणि जन्मकुंडली

ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शनी तिसऱ्या, सहाव्या, आठव्या आणि बाराव्या स्थानी असेल, तर अशा व्यक्तींवर शनीची अवकृपा होत नाही किंवा प्रतिकूल प्रभाव पडत नाही, असे म्हटले जाते. तसेच शनी कुंडलीतील उच्च स्थानी असेल, तर शनी प्रतिकूल न राहता अनुकूल होतो. शनी अधिक कष्टकारक होत नाही, असे सांगितले जाते.

शनी महाराजांची कृपादृष्टी हवीये? 'हे' पाच उपाय अत्यंत उपयुक्त

'या' राशीच्या व्यक्तींना शनी लाभदायक

शनी महाराज मकर आणि कुंभ या दोन राशींचे स्वामी मानले जातात. राशीस्वामी असल्यामुळे या दोन राशीच्या व्यक्तींवर साडेसाती सुरू असली, तरी शनीचा प्रतिकूल प्रभाव पडत नाही, असे मानले जाते. तसेच तुळ ही शनीची उच्च राशी मानली गेली आहे. त्यामुळे शनी साडेसाती आणि ढिय्या दशा यांचा प्रतिकूल प्रभाव तुळ राशीच्या व्यक्तींवर पडत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. तसेच ज्या व्यक्तींच्या कुंडलीत चंद्र उच्च किंवा मजबूत स्थानी असतो, त्या राशीच्या व्यक्तींवर साडेसाती किंवा ढिय्या दशा यांचा वाईट प्रभाव पडत नाही, असे सांगितले जाते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज