अ‍ॅपशहर

रामायणः नेहमीच आठवतील 'हे' रोमांचकारी प्रसंग

करोना विषाणू जगभरात अद्यापही थैमान घालत आहे. करोना बाधिक रुग्णांची संख्या लाखोंच्या घरात गेली आहे. तर करोना व्हायरस संसर्ग होऊन हजारों नागरिक जागतिक पातळीवर मृत्युमुखी पडले आहे. भारतातील करोना बाधितांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊन घोषित करून देशवासीयांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. देशाची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. तर दुसरीकडे, ज्या मालिकेने एकेकाळी रस्ते ओस पडायचे; दूरदर्शन संचाचीही पूजा केली जायची, अशी रामायण मालिका पुन्हा सुरू करण्यात आली आहे. देशवासीयांना घरात ठेवण्याचा एक प्रयत्न सरकारकडून यानिमित्ताने केला जात आहे. ज्या मालिकेने इतिहास घडवला, त्या रामायणातील काही रोमांचकारी प्रसंग...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Mar 2020, 1:14 pm

महाराष्ट्र टाइम्स.कॉम know interesting stories of ramayana and foster your memories
रामायणः नेहमीच आठवतील 'हे' रोमांचकारी प्रसंग

​सीतेचे दागिने ओळखण्यास लक्ष्मण असमर्थ

रामायणमधील किष्किंधा कांड यामध्ये या प्रसंगाचे वर्णन आले आहे. रावणाकडून सीतेचे हरण केले जाते, त्यावेळी खुणेसाठी सीता आपले दागिने साडीच्या तुकड्यात बांधून खाली टाकते. हे दागिने सुग्रीवाला सापडतात. श्रीराम आणि सुग्रीव यांची भेट होते, तेव्हा सुग्रीव श्रीरामांना सीतेचे दागिने दाखवतात. हे दागिने आपल्या ओळखीचे आहेत का, असे सुग्रीव श्रीराम व लक्ष्मण यांना विचारतो. यावर, लक्ष्मण यांना अश्रू अनावर होतात आणि ते श्रीरामांना सांगतात, रामा, वहिनीच्या चरणांशिवाय मला काहीच अन्य दिसले नाही. त्यामुळे सीतेचे पैंजण केवळ मी ओळखू शकतो.

​हनुमानपुत्राची जन्मकथा

रामभक्त हनुमान आजीवन ब्रह्मचारी होते, हे आपण सर्वजण जाणतोच. मात्र, मकरध्वज नामक पुत्र हनुमंतांचा होता. सीतेच्या शोधासाठी हनुमान लंकेत गेला. तेव्हा मेघनाद हनुमानाच्या शेपटीला आग लावतो. शेपटीला आग लावताच हनुमान लंका जाळतो आणि आपले पुच्छ शांत करण्यासाठी समुद्रात उतरतो. तेव्हा त्यांच्या घामाचे काही थेंब सागरात पडतात. यातील एक थेंब एक सागरकन्या पिते. त्यापासून त्या सागरकन्येला मकरध्वज नामक पुत्रप्राप्ती होते, अशी एक रोमांचकारी कथा सांगितली जाते.

​शबरी आणि श्रीराम

श्रीराम आणि लक्ष्मण सीता शोधार्थ वनातून जात असताना वाटेत मतंग ऋषींचा आश्रम लागतो. या आश्रमात श्रीराम विश्राम करतात. शबरी आणि श्रीरामांची भेट त्याच आश्रमात होते. श्रीरामांना बोरे कडवट लागू नयेत, म्हणून शबरी आधी ती थोडी चाखून पाहते. शबरीची ही कृती लक्ष्मणाला रुचत नाही. मात्र, शबरीची कृती ही तिच्या श्रद्धेचा एक भाग असल्याचे श्रीराम समजवतात. शबरीने फेकलेली बोरे आणि अन्य कंदमुळे पुढे बेशुद्ध झालेल्या लक्ष्मणाला पुन्हा शुद्धीवर आणण्यास उपयोगी पडतात, अशी मान्यता आहे.

​आधी हनुमान, मग श्रीराम

रावणाचा वध केल्यानंतर सर्वजण अयोध्येला परततात. श्रीराम गादीवर बसतात. रामराज्यास सुरुवात होते. आपला सर्वांत प्रिय भक्त हनुमानाला अयोध्येत राहण्याची परवानगी आणि एक जागा श्रीराम देतात. तसेच रामाची भेट घेण्यापूर्वी हनुमानाची भेट घेण्याचा अधिकारही दिला. त्यामुळे सध्या अयोध्येत असलेल्या श्रीरामांची भेट घेण्यापूर्वी हनुमान गढी मंदिरात जाऊन प्रथम हनुमंतांचे दर्शन भक्तगण घेतात आणि नंतरच श्रीरामांचे दर्शन करतात. स्वतंत्र भारतातील श्रीरामांचा वनवास पूर्ण झाला असून, लवकरच श्रीरामांचे भव्य मंदिर अयोध्येत बांधले जाणार आहे.

​मंदोदरीने मारली रावणाला लाथ

सीता शोधार्थ हनुमान लंकेत पोहोचतो. हनुमानाला पाहण्यासाठी रावण उठण्याचा प्रयत्न करतो. मात्र, हनुमान आपल्या मायाजालाने रावणाचे केस पलंगाला बांधून ठेवतो आणि मंदोदरी रावणाला लाथ मारेल, तेव्हाच त्याचे केस सुटतील, अशी योजना करतो. नाईलाजास्तव रावण आपले मस्तक मंदोदरीसमोर धरतो आणि मंदोदरीला लाथ मारण्याची विनंती करतो. आपल्या पतीची सुटका व्हावी, म्हणून शेवटी मंदोदरी रावणाला हलकेच लाथ मारते आणि रावणाची सुटका होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज