अ‍ॅपशहर

Happy New Year 2023 Wishes in Marathi : नुतन वर्षाच्या अशा द्या खास शुभेच्छा

नवीन वर्ष हा जगभरातील साजरा केला जाणारा सर्वात महत्वाचा दिवस आहे आणि आपण तो पूर्ण उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतो. नवीन वर्ष २०२३ च्या या शुभ प्रसंगी आपल्या प्रियजनांना काही अद्भुत शुभेच्छा देऊया आणि हा आनंद उत्साह द्विगुणीत करूया...

Authored byप्रियंका वाणी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Jan 2023, 7:38 am
नवीन वर्ष हा जगभरातील साजरा केला जाणारा सर्वात महत्वाचा दिवस आहे आणि आपण तो पूर्ण उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतो कारण आपला विश्वास आहे की प्रत्येक दिवस मागील दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे, मग आजपासून नवीन वर्षाच्या शुभेच्छांसह ह्या सुंदर दिवसाची सुरुवात का करू नये? जो वर्षातून एकदाच येतो! आणि नवीन वर्ष २०२३ च्या या शुभ प्रसंगी आपल्या प्रियजनांना काही अद्भुत शुभेच्छा देऊया आणि हा आनंद उत्साह द्विगुणीत करूया...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम New Year 2023
नवीन वर्ष २०२३


"मना मनातून आज उजळले
आनंदाचे लक्षदिवे…
समृध्दीच्या या नजरांना
घेऊन आले वर्ष नवे….
आपणांस व आपल्या परीवारास
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!"

"पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा लाभो एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा..!"

"या वर्षात माझ्या सुखात दुःखात
माझ्या बरोबर उभे राहिलात,
याबद्दल मी तुमचा आभारी आहे..
या वर्षात माझ्याकडून कळत नकळत
कुणाचे मन दुखले असेल तर,
मला मोठ्या मनाने माफ करा..
आणि पुढेही असेच आयुष्यभर
माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या..
आपणास व आपल्या परिवाराला साल २०२३ या
येणाऱ्या नवीन वर्षाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!"

"नवं पान, नवा दिवस,
नवी स्वप्नं, नवी ध्येयं,
नव्या आशा, नव्या दिशा,
नवी माणसं, नवी नाती,
नवं यश, नवा आनंद.
कधी अपूर्ण, कधी संपूर्ण,
नवा हर्ष, नवं वर्ष…!
या सुंदर वर्षासाठी
तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!"

"जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे..”
सन २०२३ साठी हार्दीक शुभेच्छा..!"

"येवो समृद्धि अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नव वर्षाच्या या शुभदिनी..!"
नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.
लेखकाबद्दल
प्रियंका वाणी
महाराष्ट्र टाइम्स मध्ये भविष्य सेक्शनसाठी कंन्टेंट रायटर म्हणून २ वर्षापासून काम करत आहे. वैदिक ज्योतिष, आर्थिक भविष्य, राशीभविष्य, अंक ज्योतिष, टॅरो कार्ड, पंचांग, धार्मिक विषय आणि, सण उत्सवासंबंधी अचुक माहिती घेऊन ज्ञान आणि अनुभवानुसार योग्य माहिती वाचकांपर्यंत पोहचवते. इलेक्ट्रॉनिक मीडिया चॅनल मध्ये काम करण्याचा अनुभव आहे, वॉइस ओवर देण्याचाही अनुभव आहे. वाचन करण्याची आवड आहे. धार्मिक, आध्यात्मिक कथा वाचणे आणि स्वरचित कविता लिहीण्याचीही आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज