अ‍ॅपशहर

Yaganti Temple History in Marathi 'या' शिवमंदिरातील नंदीचा आकार दररोज वाढतो? वाचा, यामागील रहस्य

दक्षिण भारतात असलेल्या एका शिवमंदिरातील नंदीचा आकार नियमितपणे वाढत आहे. हे प्राचीन मंदिर असून, पूरातत्त्व खात्यानेही याला दुजोरा दिला आहे. दक्षिण भारतात नेमके कुठे आहे हे शिवमंदिर? नंदीच्या मूर्तीचा आकार वाढण्यामागील रहस्य वा मान्यता काय आहेत? जाणून घ्या...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Aug 2020, 1:16 pm
महादेव शिवशंकराच्या उपासनेसाठी सर्वोत्तम काळ मानला जाणारा श्रावण महिना सुरू आहे. या श्रावण महिन्यात अनेक व्रत-वैकल्ये, सण-उत्सव साजरे केले जातात. यामध्ये शिवाची उपासना, नामस्मरण, आराधना मोठ्या प्रमाणात केली जाते. कोट्यवधी शिवभक्त या कालावधीत शिवमंदिरात जाऊन रुद्राभिषेक, दुग्धाभिषेक, जलाभिषेक करतात. मात्र, सध्याच्या काळात सर्वांना शिवमंदिरात जाता येईलच, असे नाही. त्यामुळे घरच्या घरी शिव उपासना करता येऊ शकते. शिवशंकराच्या महत्त्वाच्या प्रतीकांपैकी एक असलेले केवळ बेलाचे पान वाहिले तरी पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते, असे सांगितले जाते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shravan 2020 know about the mysterious weird shiva temple of andhra pradesh where statue of nandi increasing day by day
Yaganti Temple History in Marathi 'या' शिवमंदिरातील नंदीचा आकार दररोज वाढतो? वाचा, यामागील रहस्य


भारतीय संस्कृती ही जितकी प्राचीन आहे, तितकी ती विस्तृत आणि अनेकविध गोष्टींनी भारलेली आहे. भारतात अनेक ठिकाणी अशी काही रहस्ये दडलेली आहेत, ज्याचे उत्तर अद्याप कुणालाही मिळालेले नाही. कैलास पर्वतापासून ते रामसेतूपर्यंत केवळ थक्क करणाऱ्या अद्भूत गोष्टी भारतात आहेत. देशोदेशीच्या संशोधकांनी येऊन संशोधनेही केली आहे. मात्र, त्यांनाही याचा थांग लागलेला नाही. दक्षिण भारतात असलेल्या एका शिवमंदिरातील नंदीचा आकार नियमितपणे वाढत आहे. हे प्राचीन मंदिर असून, पूरातत्त्व खात्यानेही याला दुजोरा दिला आहे. दक्षिण भारतात नेमके कुठे आहे हे शिवमंदिर? नंदीच्या मूर्तीचा आकार वाढण्यामागील रहस्य वा मान्यता काय आहेत? जाणून घ्या...

​ ​शिवमंदिराचे ठिकाण

दक्षिण भारतातील आंध्र प्रदेशात असलेल्या कुरनूल जिल्ह्यात श्री यंगती उमा महेश्वर नामक मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम वैष्णव परंपरेनुसार केल्याचे सांगितले जाते. तसेच या मंदिराची उभारणी १५ व्या शतकात करण्यात आली आहे. विजयनगर साम्राजाचे संगमवंशीय राजा हरिहर बुक्का यांच्या काळात या मंदिराचे बांधकाम झाल्याचे सांगितले जाते. हैदराबादपासून सुमारे ३०८ कि.मी. अंतरावर हे मंदिर आहे. तर विजयवाडापासून याचे अंतर ३५९ कि.मी. आहे. प्राचीन काळातील पल्लव, चोला, चालुक्य आणि विजयनगर संस्कृतीचे प्रतीक म्हणून या मंदिराकडे पाहिले जाते.

हर हर महादेव! 'या' देशांमध्येही प्रकटते बाबा बर्फानी शिवलिंग; वाचा

​मंदिरातील काही खांब हटवले!

या मंदिरातील नंदीची मूर्ती मोठी आहे. या शिवमंदिरातील नंदीचा आकार गेली अनेक वर्षे वाढत चालला आहे. नंदीच्या वाढत चाललेल्या आकारमानामुळे मंदिरातील काही खांबही हटवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, हे मंदिर शिव-पार्वती यांना समर्पित आहे. या मंदिरातील नंदीची मूर्ती ही पूर्वी छोट्या स्वरुपात होती. मात्र, आता तिने भव्य रुप धारण केले आहे. पुरातत्त्व खात्याने या ठिकाणी संशोधन केले असता, त्यांनाही ही गोष्ट पटली. पुरातत्त्व खात्यानाही ही बाब मान्य केली आहे. शास्त्रज्ञांच्या मते प्रत्येक २० वर्षांनी या नंदीचा आकार एक इंचाने वाढतो. मात्र, यामागे एक पौराणिक कथाही सांगितली जाते. एका शापामुळे नंदीचा आकार वाढत असून, या मंदिर परिसरात एकही कावळा दिसत नाही.

नंदीशिवाय शिवमंदिर? 'या' ठिकाणचे रहस्य ऐकून व्हाल थक्क; वाचा

​शिवमंदिराची स्थापना

एका मान्यतेनुसार, अगस्त्य ऋषींनी याची स्थापना केली होती. वास्तविक अगस्त्य ऋषींना या ठिकाणी वेंकटेशाचे मंदिर स्थापन करण्याची इच्छा होती. मात्र, बांधकाम करताना मूर्तीचा अंगठा भंग पावला आणि हे काम थांबवण्यात आले. अगस्त्य ऋषी निराश झाले आणि महादेव शिवशंकराची तपस्या करू लागले. कठोर तपश्चर्येनंतर शिव प्रसन्न झाले. या ठिकाणी शिवमंदिर बांधणे योग्य होईल, असे वरदान दिले. महादेवाच्या आज्ञेवरून अगस्त्य ऋषींनी शिवमंदिराची उभारणी केली, अशी एक कथा सांगितली जाते.

रोज रंग बदलणाऱ्या शिवलिंगाची 'ही' रहस्ये माहित्येत? विज्ञानही शरण

​कावळ्यांना शाप

अगस्त्य ऋषी तपश्चर्येला बसलेले असताना वारंवार कावळे येऊन त्यांना त्रस्त करीत असत. त्यामुळे अनेकदा अगस्त्य ऋषींच्या साधनेत व्यत्यय आला. शेवटी क्रोध अनावर झाल्याने अगस्त्य ऋषींनी कावळ्यांना या परिसरात कधीही न फिरकण्याचा शाप दिला. कावळा हे शनी देवतेचे वाहन असल्यामुळे या ठिकाणी शनी देवतेचा वास किंवा प्रभाव राहत नाही, असे सांगितले जाते. या शापामुळे या परिसरात कावळे कुठेही दिसत नाहीत, असे सांगितले जाते. स्थानिकांकडून या कथेबाबत माहिती दिली जाते.

महाभारतातील एक योद्धा आजही 'या' शिवमंदिरात दर्शनाला येतो? वाचा

​अर्धनारीनटेश्वर

आंध्र प्रदेशातील या मंदिरात महादेव शिवशंकर आणि पार्वती देवीची अर्धनारीनटेश्वर रुपात स्थापन करण्यात आली आहे. एकाच पाषाणातून ही पूर्ण मूर्ती घडवल्याचे पाहायला मिळते. देशभरातील केवळ या मंदिरात शिवशंकराच्या मूर्तीची पूजा केली जाते, असा दावा केला जातो. बाकी सर्व मंदिरांमध्ये शिवपिंडीची पूजा केली जाते. या मंदिर परिसरातील निसर्ग सौंदर्यही केवळ अप्रतिम असेच आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी पुष्कर्णिनी नावाचा एक पवित्र जलस्रोत आहे, जो कायम वाहत असतो. या ठिकाणी बारा महिनेही पाणी असते. हे पाणी नेमके कुठून येते, याचा मात्र अद्यापही नेमका शोध लागलेला नाही.

'ही' आहेत प्राचीन संस्कृतीचा वारसा जपणारी महाराष्ट्रातील शिवमंदिरे

महत्वाचे लेख