अ‍ॅपशहर

Sun Transit: सूर्याचे कुंभ राशीत मार्गक्रमण; 'या' ५ राशींना कुटुंब कलह, आर्थिक तंगीसह होणार इतके नुकसान

Surya Rashi Parivartan : सूर्य ग्रह १३ फेब्रुवारी रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या राशीपरिवर्तनाचा काही राशींवर शुभ तर काही राशींवर अशुभ प्रभाव राहील. पाहूया सूर्याच्या मार्गक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर नकारात्मक प्रभाव पडेल.

Authored byप्रियंका वाणी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Feb 2023, 5:39 pm
सूर्याचे कुंभ राशीत १३ फेब्रुवारी २०२३ रोजी संक्रमण होणार असून, सूर्य शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करेल. यावेळी कुंभ राशीत सूर्य आणि शनि आमनेसामने येतील. कारण, आताच शनीचे कुंभ राशीत संक्रमण झाले आहे. अशा परिस्थितीत सूर्य आणि शनीची भेट अनेक राशींसाठी नुकसानदायक ठरणार आहे. ज्योतिष शास्त्रात सूर्यदेवाला उष्ण स्वभावाचा ग्रह म्हटले आहे. तर शनि हा थंड वाऱ्यांचा कारक आहे. यामुळे या दोघांची भेट फारशी चांगली नाही. चला जाणून घेऊया कोणत्या राशीसाठी सूर्याचे भ्रमण अशुभ असेल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sun transit in aquarius negative impact on these zodiac signs in marathi
Sun Transit: सूर्याचे कुंभ राशीत मार्गक्रमण; 'या' ५ राशींना कुटुंब कलह, आर्थिक तंगीसह होणार इतके नुकसान


कर्क राशीवर सूर्याचा अशुभ प्रभाव

कर्क राशीच्या लोकांसाठी सूर्याचे संक्रमण आठव्या भावात असेल. या दरम्यान तुम्हाला तुमच्या सामानाची विशेष काळजी घ्यावी लागेल. कारण, यावेळी तुमच्या काही मौल्यवान वस्तू चोरीला जाऊ शकतात. यावेळी तुमची आर्थिक स्थितीही मध्यम राहील. वास्तविक, तुमचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच, या काळात तुम्हाला काही वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. सूर्याचे भ्रमण तुम्हाला विनाकारणचा प्रवासही घडवू शकतो.

कन्या राशीवर सूर्याचा अशुभ प्रभाव

सूर्य तुमच्या राशीत सहाव्या भावात प्रवेश करेल. जरी या स्थानी राहिल्याने अनुकूल परिणाम मिळत असले तरी या काळात तुम्हाला तुमच्या विरोधकांपासून सावध राहण्याची गरज आहे. एवढेच नाही तर या काळात तुमचा खर्चही लक्षणीय वाढू शकतो. यावेळी तुमचा खर्च खूप जास्त असेल. व्यवसायानिमित्त तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागू शकतो. यावेळी तुम्हाला तुमच्या आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी लागेल. या काळात पोटाशी संबंधित समस्यांमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुम्हाला डाव्या डोळ्याशी संबंधित एखादी समस्या असू शकते.

वृश्चिक राशीवर सूर्याचा अशुभ प्रभाव

कुंभ राशीच्या संक्रमणादरम्यान सूर्य तुमच्या चौथ्या स्थानी प्रवेश करेल. अशा परिस्थितीत हे संक्रमण आपल्यासाठी अधिक अनुकूल म्हणता येणार नाही. या दरम्यान, कौटुंबिक जीवनात मतभेद किंवा तणावाची परिस्थिती उद्भवू शकते. कुटुंबात संतुलन राखावे लागेल. या दरम्यान, तुमच्या आरोग्यावर खूप नकारात्मक परिणाम होईल. तुम्हाला डोकेदुखी, अंगदुखी आणि छातीत जंतुसंसर्ग संबंधित काही आजार असू शकतात. या प्रवासादरम्यान तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहू शकता.

मकर राशीवर सूर्याचा अशुभ प्रभाव

सूर्य कुंभ राशीत गेल्याने मकर राशीच्या लोकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. या काळात तुमच्या परस्पर संबंधांवर वाईट परिणाम होऊ शकतो. या काळात तुम्हाला दातांसंबंधी अधिक समस्या निर्माण होतील. या काळात तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याचीही काळजी घ्या. व्यापारी वर्गातील लोकांसाठी हा काळ भांडवली गुंतवणुकीसाठी असेल. या दरम्यान, तुम्ही कुठेही पैसे गुंतवत असाल तर तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती असेल याची काळजी घ्यावी.

कुंभ राशीवर सूर्याचा अशुभ प्रभाव

सूर्याचे संक्रमण फक्त तुमच्या कुंभ राशीत होणार आहे. सूर्य संक्रमणाचा प्रभाव तुमच्या आरोग्यावर आणि विचारांवर अधिक असणार आहे. हा काळ तुम्हाला शारीरिक त्रास देणारा असेल. या दरम्यान तुम्हाला मानसिक तणावही जाणवू शकतो. अहंकाराला तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका. कारण, अहंकाराच्या भावनेमुळे तुमचे नुकसान होईल.

लेखकाबद्दल
प्रियंका वाणी
महाराष्ट्र टाइम्स मध्ये भविष्य सेक्शनसाठी कंन्टेंट रायटर म्हणून २ वर्षापासून काम करत आहे. वैदिक ज्योतिष, आर्थिक भविष्य, राशीभविष्य, अंक ज्योतिष, टॅरो कार्ड, पंचांग, धार्मिक विषय आणि, सण उत्सवासंबंधी अचुक माहिती घेऊन ज्ञान आणि अनुभवानुसार योग्य माहिती वाचकांपर्यंत पोहचवते. इलेक्ट्रॉनिक मीडिया चॅनल मध्ये काम करण्याचा अनुभव आहे, वॉइस ओवर देण्याचाही अनुभव आहे. वाचन करण्याची आवड आहे. धार्मिक, आध्यात्मिक कथा वाचणे आणि स्वरचित कविता लिहीण्याचीही आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज