अ‍ॅपशहर

मिठाने नकारात्मक ऊर्जा होते नष्ट; तुम्ही कधी हा उपाय करून पाहिलाय का?

आपल्या सगळ्या घराची वास्तू पूर्णपणे नकारात्मक व सकारात्मक उर्जेने व्यापलेली असते. घरात अशा काही वस्तू असतात त्यातून सकारात्मक उर्जा मिळते आणि नकळतपणे काही असे दोष असतात त्यामुळे नकारात्मक उर्जेला प्रोत्साहन मिळते. हेच दोष दूर करण्यासाठी वास्तूत काही उपाय सांगितले गेले आहेत. आज यातला उपाय जाणून घेऊया. हे आहेत मीठाचे उपाय. वास्तूत मीठाचा उपयोग नकारात्मक उर्जा नष्ट करण्यासाठी केला जातो. मीठाचे काही सोपे आणि फायदेशीर उपाय...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Feb 2021, 5:48 pm
आपल्या सगळ्या घराची वास्तू पूर्णपणे नकारात्मक व सकारात्मक उर्जेने व्यापलेली असते. घरात अशा काही वस्तू असतात त्यातून सकारात्मक उर्जा मिळते आणि नकळतपणे काही असे दोष असतात त्यामुळे नकारात्मक उर्जेला प्रोत्साहन मिळते. हेच दोष दूर करण्यासाठी वास्तूत काही उपाय सांगितले गेले आहेत. आज यातला उपाय जाणून घेऊया. हे आहेत मीठाचे उपाय. वास्तूत मीठाचा उपयोग नकारात्मक उर्जा नष्ट करण्यासाठी केला जातो. मीठाचे काही सोपे आणि फायदेशीर उपाय...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम salt for vastu positive energy and many more benefits
मिठाने नकारात्मक ऊर्जा होते नष्ट; तुम्ही कधी हा उपाय करून पाहिलाय का?


मिठाने नकारात्मक ऊर्जा होते नष्ट

​मीठ आणि काचेचा उपाय

काचेच्या एका बाउल मध्ये थोडे समुद्री मीठ आणि ४-५ लवंग घाला आणि ते बाउल घराच्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवा. हा उपाय केल्याने तुमच्या घरी पैशांची कमतरता दूर होते आणि घरात सकारात्मक उर्जेचा संचार होतो. घरातील प्रत्येक बाबतीत समृद्धी येईल. यासोबत घराच्या वातावरणात सुख व सौहार्दाचे वातावरण निर्माण होते. याव्यतिरिक्त मीठ व लवंगाचे पाणी घरात शिंपडले तर घरात एक वेगळंच सुवास पसरतो. त्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होते.

तुमचे स्वयंपाकघर बायकोला आजारी तर पाडत नाही ना? 'या' गोष्टींकडे लक्ष द्या...

​बाथरूममध्ये वास्तू दोष असल्यास

याव्यतिरिक्त जर बाथरूममध्ये वास्तुदोष असेल तर थोडे मीठ काचेच्या बाउलमध्ये घेऊन ते बाथरुमच्या एका कोपऱ्यात ठेवा. अशा ठिकाणी ठेवा जेणेकरून कोणी त्या बाउल ला हात लावू शकणार नाही. थोड्या थोड्या वेळाने काचेच्या बाउल मधील मीठ बदलत रहावे. असे केल्याने बाथरूममधील सर्व प्रकारचे दोष नष्ट होतील. बाथरूममध्ये मीठ ठेवल्याने तुमचे आरोग्य चांगले राहते व तुम्ही मानसिक तणावापासून दूर राहता. यामुळे घरातून नकारात्मक उर्जा नाहीशी होते.

आर्थिक समस्यांपासून मिळवा मुक्ती; वास्तू संबंधी 'हे' उपाय ठरतात लाभदायक

मिठाच्या पाण्याने अंघोळ करणे

जर कधी तुमचे मन उदास असेल, थकवा जाणवत असेल तर बाथरूममध्ये जाऊन मिठाच्या पाण्याने अंघोळ करा. असे केल्याने तुम्ही स्वतःला तरतरीत व ऊर्जावान वाटायला लागेल. तुमचा उदासपणा चुटकीभर मिठाने दूर होईल. हा उपाय केल्याने डोक्यातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी करते.

गोष्टी लक्षात राहत नसतील तर वास्तूशी संबंधित गोष्टींकडे द्या लक्ष

​मिठाचे पाणी

वास्तूमध्ये मिठाला विशेष महत्व आहे. तुम्ही मिठाला पाण्यात घालून ते घरात ठिकठिकाणी ठेऊ शकतात व सर्व दिशेला ठेऊ शकतात. पण लक्षात ठेवा की त्यातील पाणी बदलताना ते घरात कुठेही सांडले नाही पाहिजे. ते तुम्ही किचनमध्ये सिंक मध्ये किंवा टॉयलेट मध्ये फ्लश करू शकता.

जाणून घेऊया कोणत्या दिशेला तोंड करून जेवल्याने लक्ष्मी प्राप्त होते

​मिठाने मूर्ती आणि इतर गोष्टी स्वच्छ करू शकता

मिठाच्या शक्तीला सगळेजण मानतात. बरेचदा असे दिसून येते की घरातील मूर्ती व अन्य धातूंचे सजावटीचे समान हळूहळू ते फिके पडायला लागते. अशात अधे-मध्ये त्या वस्तू मिठाने स्वच्छ करणे आवश्यक असते. यामुळे त्या वस्तू चमकतात. नव्याने सकारात्मक उर्जा निर्माण होताना दिसते.

धन व समृध्दी प्राप्त करण्यासाठी शुक्रवारी करून पाहा हे उपाय,महालक्ष्मीची होईल कृपा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज