अ‍ॅपशहर

वास्तुशास्त्र : तुमच्या घरात टिव्ही, फ्रीज, कुलर, एसी आणि वाटर फिल्टर या योग्य ठिकाणी आहे का ?

ह्या वस्तू चुकीच्या ठिकाणी ठेवल्या तर त्यातून नकारात्मक उर्जा प्रवाहित होते. त्यामुळे घराच्या वास्तूत समस्या निर्माण होतात. जाणून घेऊया या सामानाची ठेवायची योग्य जागा...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 May 2021, 12:34 pm
आपल्याकडे वास्तुशास्त्रात प्रत्येक वस्तूचे विशेष महत्व असते. त्याचप्रमाणे प्रत्येक वस्तू ठेवण्याची योग्य दिशा आणि पद्धत असते. या गोष्टी योग्य त्या ठिकाणी ठेवल्याने घरची वास्तू योग्य असते. एखादी वस्तू जरी चुकीच्या ठिकाणी ठेवली गेली तर वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. आज घरात दररोज वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या जागेबाबत माहिती जाणून घेणार आहोत. ज्योतिषानुसार घरातील इलेक्ट्रोनिक वस्तूंवर राहू व शनिचा प्रभाव असतो. जर ह्या वस्तू चुकीच्या ठिकाणी ठेवल्या तर त्यातून नकारात्मक उर्जा प्रवाहित होते. त्यामुळे घराच्या वास्तूत समस्या निर्माण होतात. जाणून घेऊया या सामानाची ठेवायची योग्य जागा...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम vastushastra proper places to put tv fridge ac and water filter in marathi
वास्तुशास्त्र : तुमच्या घरात टिव्ही, फ्रीज, कुलर, एसी आणि वाटर फिल्टर या योग्य ठिकाणी आहे का ?

इस्त्राईल-पॅलेस्टाईनमधील भांडण, त्याचा भारतावर काय परिणाम होईल?


​वाटर फिल्टरची जागा

आजकाल स्वयंपाकघरातच वाटर फिल्टर ठेवण्याला लोकांची पसंती असते. तुम्ही देखील असे करू शकता. परंतु किचनमध्ये ते लावताना उत्तर दिशेला लावणे चांगले मानले जाते. ही दिशा पाण्याची दिशा असते. म्हणूनच घराच्या उत्तर दिशेला पाण्याशी संबंधित गोष्टी असणे शुभ मानले जाते. म्हणून घरी उत्तर दिशेला वाटर फिल्टर लावला पाहिजे. यामुळे घरात राहणाऱ्या लोकांच्या तब्येतीवर आणि आर्थिक स्थितीवर अनुकूल परिणाम होतो.

कुलर, एसी ठेवण्याची जागा

वायव्य दिशा ही हवेची जागा मानली जाते. म्हणजेच उत्तर आणि पश्चिम च्या मध्यात असलेल्या उत्तर-पश्चिम दिशेला वायव्य कोन मानला जातो. या दिशेला कुलर व एसी लावल्यास त्याचा प्रभावाने आयुष्य वाढते. जर असे करणे शक्य नसेल तर उत्तर दिशेला या वस्तू ठेवाव्यात त्यानेदेखील सुख मिळेल.

बुधाचा मिथुन राशीत प्रवेश, या ६ राशींना आर्थिक आणि करियरच्या दृष्टीने लाभ

​घरातील टीव्हीची दिशा

घरातील लिव्हिंग रूम मध्ये बहुतेक लोकं टिव्ही ठेवतात. हा टिव्ही रुममध्ये पूर्व दिशेच्या भिंतीवर लावणे चांगले असते. यामुळे टिव्ही बघत असताना तुमचे तोंड पूर्वेला असते त्यामुळे तुमच्यात सकारात्मक उर्जेचा संचार होतो. जर काही कारणाने हे शक्य नसेल तर उत्तर दिशेच्या भिंतीवर टिव्ही लावू शकता.

​फीज कुठे ठेवावा?

पश्चिम दिशेच्या भिंतीजवळ फ्रीज ठेवावा. वीज संबंधी उपकरणांसाठी ही दिशा योग्य मानली जाते. या दिशेला फ्रीज ठेवल्याने माणसाचे आयुष्य वाढते आणि फ्रिजच्या सेवेचा भरपूर लाभ घेता येतो. याचा अजून एक फायदा म्हणजे जेव्हा जेव्हा फ्रीज उघडला जातो तेव्हा त्याचे तोंड पूर्व दिशेला असते आणि त्यामुळे त्यातील वस्तूंमध्ये सकारात्मकता निर्माण होते.

मोहिनी एकादशी २०२१ : यामुळे श्रीरामांनीही केले एकादशी व्रत

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज