अ‍ॅपशहर

Wooden Ganpati लाकडी गणपती घरात ठेवण्याचे अनेक फायदे, वास्तूनुसार जाणून घेऊया मूर्तीचे खास लाभ

Wooden Ganpati Labh In Marathi : बुधवार ३१ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी असून, यंदाचा गणेश उत्सव जल्लोष आणि उत्साहात साजरा होणार आहे. घरोघरी गणेशाच्या स्वागताची तयारी सुरू झाली आहे. विविध स्वरुपात गणपतीचे पूजन केले जाते. अशा या गणपतीची घरात स्थापना करताना लाकडी गणपतीचे लाभ जाणून घेऊया.

Authored byप्रियंका वाणी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Aug 2022, 5:37 pm
गणपती उत्सव काही दिवसांवर आला आहे. सर्व दोन वर्षानंतर खूप जल्लोषात गणेश उत्सव साजरा करणार आहे. प्रत्येक मंडळाची तयारी सुरू झाली आहे. घरी देखील कशी आणि कोणती गणेश मुर्ती बसवावी, कशी सजावट करावी अशी चर्चा सुरू झाली असून, खरेदी देखील जोरात सुरू आहे. काही भाविक पिओपी तर काही पर्यावरणाचा विचार करता शाळू मातिची गणेश मुर्ती खरेदी करतात. पिओपीची गणेश मुर्ती स्थापन करू नये असाही सल्ला दिला जातो. भाविकांनी गणेश मुर्ती खरेदी करण्यास सुरवात केली आहे. तर, पर्यावरणाचा विचार करता आणि वास्तूनुसार इतर लाभासाठी जाणून घेऊया लाकडी गणपती मुर्ती स्थापनेचे फायदे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Wooden Ganpati
लाकडी गणपती घरात ठेवण्याचे अनेक फायदे


लाकडी गणेश मुर्ती स्थापन करण्याचे फायदे

घरात लाकडी गणेश मुर्ती स्थापन करणे खूप शुभ असते.
एखाद्या ज्योतिषाच्या सल्यानुसार तुम्ही लाकडी गणेशाची स्थापना करू शकतात.
तसेच लाकडी गणेश मुर्ती कुटुंबातील सदस्यांना सुख आणि सौभाग्याची प्राप्ती देते.
यामुळे आपलं आयुष्य देखील वाढतं.

गणपती बाप्पा बसवण्याचा शुभ मुहूर्त शोधताय ? तर जाणून घ्या स्थापनेचा शुभ मुहूर्त आणि इतर खास गोष्टी

ज्योतिष शास्त्रानुसार घरात, लिंबाच्या झाडाच्या लाकडापासून तयार करण्यात आलेली श्रीगणेशाची मूर्ती स्थापित केल्यास सर्वप्रकारच्या बाधा दूर होण्यास मदत होते. या उपायाने घरात सुख-शांती कायम राहते. येथे जाणून घ्या, लिंबाच्या लाकडापासून तयार केलेल्या गणेश मूर्तीचे काही खास लाभ...

गणेश उत्सवाच्या काळात घरात अशा प्रकारच्या गणपतीची स्थापना करणे शुभ मानण्यात येते. तंत्रशास्त्रात अनेक वनस्पतींचा देखील वापर केला जातो. तंत्रशास्त्रानुसार जर घरात लिंबाच्या झाडापासून बनवलेली गणेश मूर्तीची स्थापना केल्यास घरात सुख-शांती राहण्यास मदत होते.

एखाद्या विशिष्ट कामासाठी बाहेर जात असाल तर पहिले लिंबाच्या झाडापासून बनवलेल्या श्रीगनेशाच्या मूर्तीचे दर्शन घ्या. कार्यात अवश्य यश मिळेल.

गणेशोत्सव दरम्यान एखाद्या रात्री लाल फूल आणि चंदनाने गणपतीची पूजा करा तसेच ऊॅं गं गणपतये नम: मंत्राच एक हजार वेळेस जप करावा. नंतर त्या गणपतीच्या मूर्तीला विसर्जनावेळी नदीत प्रवाहित करावे. असे केल्याने थांबलेली कामे होण्यास मदत होते.

घरात कुणाला कोणत्याही प्रकारची बाधा झाली असेल तर, या चमत्कारीक मूर्तीमुळे त्याचा प्रभाव कमी होण्यास मदत होते. या मूर्तीमुळे धनासंबधी अडचण कधीच जाणवणार नाही, असे सांगितले जाते.
Ganesh Chaturthi 2022 Date and Muhurat : गणेश चतुर्थी केव्हा आहे, काय आहे या चतुर्थीचे महत्त्व
लेखकाबद्दल
प्रियंका वाणी
महाराष्ट्र टाइम्स मध्ये भविष्य सेक्शनसाठी कंन्टेंट रायटर म्हणून २ वर्षापासून काम करत आहे. वैदिक ज्योतिष, आर्थिक भविष्य, राशीभविष्य, अंक ज्योतिष, टॅरो कार्ड, पंचांग, धार्मिक विषय आणि, सण उत्सवासंबंधी अचुक माहिती घेऊन ज्ञान आणि अनुभवानुसार योग्य माहिती वाचकांपर्यंत पोहचवते. इलेक्ट्रॉनिक मीडिया चॅनल मध्ये काम करण्याचा अनुभव आहे, वॉइस ओवर देण्याचाही अनुभव आहे. वाचन करण्याची आवड आहे. धार्मिक, आध्यात्मिक कथा वाचणे आणि स्वरचित कविता लिहीण्याचीही आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख