मूलांक १: आर्थिक लाभ संभवतो
आर्थिक अडचणी दूर होणारा आठवडा असेल. आर्थिक लाभ होण्याचे संकेत मिळत आहेत. व्यवसायिकांसाठी फायदा मिळवून देणारा आठवडा जाईल. नोकरदार व्यक्तींसाठी आगामी आठवडा उत्तम जाईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
मूलांक २: मोठे यश मिळेल
आठवड्याच्या अखेरीस अचानक लाभ होईल. गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळेल. या सप्ताहात मोठे यश मिळू शकते. नोकरी शोधत असणाऱ्यांना रोजगाराच्या संधी मिळतील.
कुंभः स्पर्धा परीक्षेत यश; वाचा आजचे राशीभविष्य
मूलांक ३: मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा
चंचल आणि विचलित मन आपल्या कार्यक्षेत्रात अडथळा ठरत आहेत. यामुळे मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. या आठवड्यात उधार दिलेले पैसे परत मिळतील. छोट्याश्या प्रयत्नांनी कार्यक्षमता वाढेल.
'गण गण गणात बोते'चा मंत्र देणारे गजानन महाराज
मूलांक ४: प्रवासातून नव्या संधी
नवीन काम आणि मागील उधार चुकता झाल्यामुळे मन प्रसन्न राहील. प्रवासामुळे व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होतील. यामुळे धनलाभ होईल. प्रेमी युगुलांसाठी आगामी आठवडा नातेसंबंध दृढ करणारा राहील.
महाशिवरात्रीः 'ही' आहेत पांडवकालीन शिवमंदिरे
मूलांक ५: वाणी संयमित ठेवा
वाणीवर नियंत्रण ठेवा. समोरच्याचे मन दुखावू नका. बोलणे संयमित न ठेवल्यास नुकसान होऊ शकते. जोडीदाराशी वाद झाल्यामुळे मानसिक तणाव वाढेल.
शिवरात्रीः पाकमध्येही घुमतो बम बम भोलेचा गजर
मूलांक ६: व्यापारात वाढ होईल
व्यापार-व्यवसायात वृद्धी होईल. धार्मिक कार्यामुळे मन शांत आणि एकाग्र होण्यास मदत होईल. नोकरीत बढतीचे योग आहेत. आगामी आठवड्यात आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.
संत सर्वज्ञ, नाथपंचकांमधील एक संतश्रेष्ठ दासोपंत
मूलांक ७: नव्या संधी मिळतील
आठवड्याची सुरुवात दमदार होईल. नव्या संधी मिळतील. या संधीचे सोने कराल. आठवड्याच्या शेवटी विचलित मनामुळे कार्यक्षेत्रावर परिणाम होईल. सावधगिरी बाळगा. दाम्पत्य जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो.
मूलांक ८: कार्यात यश मिळेल
आत्मविश्वासामुळे अडकलेली सर्व कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. आठवड्याच्या शेवटी आरोग्याच्या तक्रारींमुळे अडचणी येतील. आरोग्याकडे लक्ष देणे लाभदायक ठरेल.
मूलांक ९: मान-सन्मान वाढेल
समाजात मान-सन्मान वाढेल. सार्वजनिक प्रतिष्ठा लाभेल. सरकारी कामे या आठवड्यात मार्गी लागतील. आगामी आठवडा अनुकूल राहील. नवीन ओळखी लाभदायक ठरतील.