अ‍ॅपशहर

महिंद्रा घेवून येतेय जबरदस्त SUV, १५ ऑगस्टला पाहा झलक

महिंद्रा अँड महिंद्राची जबरदस्त कार या वर्षी भारतीय बाजारात लाँच करण्यात येणार आहे. महिंद्रा थार (Next-gen Mahindra Thar) या वर्षी भारतीय बाजारात येणाऱ्या बहुप्रतिक्षीत कार पैकी एक कार आहे. १५ ऑगस्ट रोजी नवीन Mahindra Thar समोर आणली जाणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Aug 2020, 6:47 pm
नवी दिल्लीः महिंद्रा कंपनीची नवीन महिंद्रा थार (Next-gen Mahindra Thar) या वर्षी भारतीय बाजारात येणाऱ्या बहुप्रतिक्षीत कार पैकी एक कार आहे. नवीन थारला या वर्षीच्या सुरुवातीला आणले जाणार होते. परंतु, करोना व्हायरसमुळे याला उशीर झाला आहे. परंतु, आता याची जास्त वाट पाहावी लागणार नाही. कंपनीने घोषणा केली आहे. की, १५ ऑगस्ट रोजी नवीन Mahindra Thar आणली जाणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2020 mahindra thar


वाचाः रॉयल एनफील्डचा जलवा, UK मध्ये 'नंबर वन'वर झेप

महिंद्रा अँड महिंद्रा चा दावा आहे की, नवीन थार टेक्नोलॉजी, कम्फर्ट आणि सेफ्टी फीचर्स मध्ये खूपच अडवान्स आहे. तसेच याची आयकॉनिक डिझाईन सुद्धा कायम राहणार आहे. नवीन थारची अधिकृत लाँचिंग डेट किंवा डिटेल्ससंबंधी कंपनीने अद्याप कोणतीही घोषणा केली नाही. कंपनी या गाडीला सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये लाँच करण्याची शक्यता आहे.

वाचाः १११० रुपयांत घरी घेऊन जा नवीन जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर

नवीन महिंद्रा थार अनेक इंजिन गियरबॉक्स कॉम्बिनेशनसोबत येणार आहे. यात नवीन २.० लीटर पेट्रोल इंजिन मिळणार आहे. जे 190bhp ची पॉवर आणि 380Nm टॉर्क जनरेट करते. या शिवाय एसयूव्हीमध्ये 140bhp पॉवरचे २.२ लीटर mHawk डिझेल इंजिनचा पर्याय असेल. एसयूव्हीत ६ स्पीड मॅन्यूअल आणि ६ स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्स पर्याय मिळणार आहे. दोन्ही इंजिन ४ व्हील ड्राइव्ह सिस्टमसोबत उपलब्ध होईल.

वाचाः सेल्टॉस SUV मुळे किआने भारतात बनवला रेकॉर्ड

लेटेस्ट फीचर्स असणार

न्यू जनरेशन महिंद्रा थार ची अधिकृत डिटेल्सची माहिती अद्याप उघड झाली नाही. टेस्टिंग दरम्यान लीक फोटोतून नवीन मॉडल संबंधी खूप माहिती समोर आली आहे. महिंद्राच्या या ऑफ रोडर एसयूव्हीमध्ये स्मार्टफोन कनेक्टिविटीसोबत टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि कलर मल्टी इन्फर्मेशन डिस्प्ले मिळणार आहे.

वाचाः मारुतीची नवी सिलेरियो येतेय, जाणून घ्या खास वैशिष्ट्ये

रिपोर्ट्समध्ये म्हटले की, नवीन थार मध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, क्रूझ कंट्रोल, फ्रंट फेसिंग रियर सिट्स, फॅक्ट्री - फीटेड हार्ड टॉप आणि पॉवर फोल्डिंग मिरर्स यासारखे फीचर्स मिळणार आहेत.

वाचाः मारुती सुझुकी ऑल्टोची 'नंबर वन'वर झेप, पाहा टॉप १० कार

वाचाः मारुती सुझुकी घेऊन येतेय ३ जबरदस्त कार, जाणून घ्या डिटेल्स

वाचाः सँट्रोपासून ऑरापर्यंत ह्युंदाईच्या कारवर जबरदस्त सूट

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज
ट्रेंडिंग