अ‍ॅपशहर

Mahindra XUV500 मध्ये मिळणार Tesla सारखे डोर-हँडल, जबरदस्त असणार फीचर्स

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची आगामी Mahindra XUV500 कार पुढच्या वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये लाँच करण्यात येणार आहे. परंतु, ही कार आतापासून चर्चेत आली आहे. या कारमध्ये महागडे फीचर्स कंपनी देणार असल्याची माहिती समोर येत आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Nov 2020, 8:42 pm
नवी दिल्लीः भारतीय बाजारात नेक्स्ट जनरेशन Mahindra XUV500 २०२१ मध्ये लाँच करण्यात येणार आहे. नवीन कारला अनेक वेळा टेस्टिंग दरम्यान पाहिले गेले आहे. याआधी या एसयूव्हीची अनेक डिटेल्स समोर आली आहेत. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, कारमध्ये डोर हँडल्सची खास डिझाईन पाहायला मिळू शकते. सध्याच्या मॉडलमध्ये साधारण व्हर्टिकल डोर हँडल्स मिळतात. परंतु, नवीन कारमध्ये पॉप-आऊट डोर हँडल डिझाइन दिली जावू शकते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Mahindra XUV500


वाचाः मारुती सुझुकीचा मोठा धमाका, ऑनलाइन विकल्या २ लाखांहून जास्त कार

टेस्लासारखे डोर हँडल
पॉप-आउट डोर हँडल डिझाइन सध्या Tesla आणि Aston Martin यासारख्या महागड्या लग्झरी कारमध्ये पाहायला मिळते. परंतु, महिंद्रा आपल्या कारच्या फायनल मॉडलमध्ये ही डिझाईन देणार की नाही, हे पाहावे लागेल. महिंद्राची योजना आहे की, XUV500 च्या स्पर्धक गाड्यांपेक्षा जास्त प्रीमियम बनवले जाण्यासाठी हे पाऊल उचलू शकते. कारच्या लीक फोटोवरून हे स्पष्ट होवू शकते.

वाचाः Royal Enfield बाइक्सची जबरदस्त डिमांड, सव्वा लाख बुकिंग्स पेंडिंग

असे असेल XUV500 चे इंटिरयर
कंपनी कारचे इंटिरियर सुद्धा प्रीमियम देत आहे. यात डिजिटल इंस्ट्रूमेंट कलस्टर आणि मोठे इंफोटेनमेंट सिस्टम देणार आहे. याची डिझाईन मर्सिडीजच्या एस क्लास आणि ई क्लासशी प्रेरित असणार आहे. या कारमध्ये इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक असणार आहे. याच्या मदतीने बटन सोबत ब्रेक लावू शकतो.

वाचाः १७ नोव्हेंबर रोजी येतेय होंडाची नवी Honda Civic, टीजर व्हिडिओत दिसली डिझाईन

ADAS टेक्नोलॉजी दिली जावू शकते

कारमध्ये सेफ्टी साठी खास ADAS टेक्नोलॉजी (अडवांस ड्राइवर असिस्टेंट सिस्टम) दिली जावू शकते. हे फीचर नुकतेच MG Gloster प्रीमियम एसयूवी पाहायला मिळू शकते. या कारमध्ये ऑटोमॅटिक इमरजन्सी ब्रेकिंग, लेन डिपार्चर वॉर्निंग, फॉरवर्ड कॉलिजन वॉर्निंग, ब्लाइंड-स्पॉट डिटेक्शन यासारखे फीचर्स मिळते. तसेच अडेप्टिव क्रूज कंट्रोल फीचर्स दिले आहेत.

वाचाः Volkswagen भारतात लाँच करणार २ नवीन SUV, समोर आली डिटेल्स

वाचाः मारुती सुझुकी S-Presso ला क्रॅश टेस्टमध्ये शून्य स्टार, टाटा मोटर्सने अशी उडवली टर!

वाचाः नव्या व्हेरियंटमध्ये आली Hyundai Kona Electric,आधीपेक्षा जास्त जबरदस्त फीचर्स

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज
ट्रेंडिंग